200 Crore Scam : 200 कोटींच्या मनीलाँड्रिंग प्रकरणी प्रकरणात (Money Laundering Case) बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Actress Jacqueline Farnandez) मोठा दिसाला मिळाला आहे. जॅकलिन फर्नांडिसला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने तिला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन (interim bail) मंजूर केला आहे. गेल्या महिनाभरापासून जॅकलिनची याप्रकरणी ईडीकडून (ED) चौकशी सुरु होती. याप्रकरणी ईडीने जॅकलिनला आरोपी करत कोर्टात पुरवणी आरोपपत्र देखील दाखल केले होते. अशामध्ये या प्रकरणाची आज सुनावणी झाली आणि कोर्टाने तिला जामीन दिला.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…
सुकेश चंद्रशेखरशी संबंधित असलेल्या 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस चांगलीच अडकली आली होती. याप्रकरणी ईडीने चौकशीसाठी तिला समन्स पाठवले होते. ईडीकडून जॅकलिनची सतत चौकशी सुरु होती. अशामध्ये या प्रकरणी जॅकलिन फर्नांडिस आज पटियाला हाऊस कोर्टात सुनावणीसाठी हजर झाली होती. कोर्टाने तिला 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे जॅकलिनला दिसाला मिळाला. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!
Jacqueline Fernandez gets interim bail in Rs 200 crore extortion case
Read @ANI Story | https://t.co/9N0GP7mtX4#JacquelineFernandez #ED #SukeshChandrasekhar pic.twitter.com/g8UvJ01j4p
— ANI Digital (@ani_digital) September 26, 2022
Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल
मनी लाँडरिंग प्रकरणातला आरोपी सुकेश सध्या तिहार तुरुंगात आहे. सुकेश चंद्रशेखरकडून जॅकलिनने कोट्यवधींच्या भेटवस्तू स्वीकारल्या असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. सुकेश चंद्रशेखरने सुमारे 7 कोटी रुपयांचे दागिने गिफ्ट केल्याचा आरोप जॅकलिनवर आहे. यासोबतच सुकेशने अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबीयांना अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहे. यामध्ये कार, महागड्या बॅग, कपडे, शूज आणि महागड्या घड्याळांचा समावेश होता. याप्रकरणाच्या चौकशी दरम्यान ईडीने स्पष्टपणे म्हटले होते की, जॅकलिनला सुकेशच्या काळ्या कारनाम्यांची माहिती होती. पण तरीही तिने त्याच्या महागड्या भेटवस्तू स्वीकारल्या.