14.5 C
New York
Saturday, September 30, 2023

Rohit Sharma Dinesh Karthik: रोहित शर्माने आधी दिनेशचा गळा पकडला अन् आता मारली मिठी, व्हिडिओ होतोय व्हायरल!

Rohit Sharma Dinesh Karthik: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात रोहित शर्माचा (Rohit Sharma) एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा संघाचा विकेटकीपर दिनेश कार्तिकचा (Dinesh Karthik) गळा पकडताना दिसत होता. रोहितने दिनेशसोबत असे का केले हा सवाल चाहत्यांना पडला होता. काहींनी रोहितवर टीका देखील केली होती. मात्र आता रोहितचा प्रेमळ अंदाज नव्या व्हिडिओमध्ये (Rohit dinesh viral video) दिसतोय. यामध्ये रोहित शर्मा दिनेश कार्तिकला मिठी मारताना दिसत आहे.Also Read – Aamna Sharif Photos: आमना शरीफचा असा लूक तुम्ही कधी पाहिला नसेल, शॉर्ट्स आणि ब्रालेटमध्ये दिसतेय हॉट!

नागपुरात झाला सामना

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (23 सप्टेंबर) नागपुरात झाला. या सामन्यात भारतीय संघाने धमाकेदार कामगिरी करताना 6 गडी राखून विजय मिळवला. सामना जिंकण्यासोबतच मैदानावर एक मजेशीर क्षणही पाहायला मिळाला. आनंदात रोहित शर्मा दिनेश कार्तिकला मिठी मारताना दिसला. यावरुन आता त्याचे कौतुक केले जात आहे. कारण यापूर्वीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तो दिनेक कार्तिकचा गळा पकडताना दिसला होता. Also Read – Walnuts Benefits: रोज खावेत 2 भिजवलेले अक्रोड, डायबिटीजसह हृदयाच्या समस्या होऊ शकतात दूर!

का पकडला होता दिनेशचा गळा?

ऑस्ट्रेलिया विरोधातील पहिल्या सामन्या रोहित दिनेशचा गळा पकडताना दिसला होता. या व्हिडिओमध्ये दिसत होते की, रोहित आपला सोबतचा खेळाडू दिनेश कार्तिकवर खूप ओरडत होता. तो रागातच कार्तिकचा गळा पकडत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते. मात्र यावेळी दिनेश हसताना दिसत होता. मात्र रोहितने असे का केले असा सवाल नेटकऱ्यांना पडला होता. यावर फलंदाज सूर्यकुमार यादवने भाष्य करत म्हटले होते की, दोन्ही खेळाडू दीर्घ काळापासून एकत्र खेळत आहेत. अशा वेळी मजाक-मस्ती सुरुच असते. हे खूप सामान्य आहे. यावरन सोशल मीडियावर अनेक मीम्स देखील शेअर केले जात होते. Also Read – Ponniyin Selvan Collection: ऐश्वर्या रॉय बच्चनच्या चित्रपटाची पहिल्याच दिवशी तगडी कमाई, जमवला एवढा गल्ला!

Your father when he catches you smoking at the local tapri pic.twitter.com/A8x1q0eWeY

— Pakchikpak Raja Babu (@HaramiParindey) September 20, 2022

आता मारली मिठी…

Captain @ImRo45‘s reaction ☺️

Crowd’s joy 👏@DineshKarthik‘s grin 👍

🎥 Relive the mood as #TeamIndia sealed a series-levelling win in Nagpur 🔽 #INDvAUS | @mastercardindia

Scorecard ▶️ https://t.co/LyNJTtl5L3 pic.twitter.com/bkiJmUCSeu

— BCCI (@BCCI) September 23, 2022

सामन्याच्या शेवटच्या षटकात भारतीय संघाला विजयासाठी 9 धावांची गरज होती. त्यानंतर सर्वोत्कृष्ट फिनिशर मानला जाणारा दिनेश कार्तिक स्ट्राईकवर उपस्थित होता. यावेळी दिनेश दोन चेंडू खेळला. पहिल्या चेंडूवर त्याने षटकार लगावला आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकत त्याने भारताला विजय मिळवून दिला. यावेळी नॉनस्ट्राइकवर कर्णधार रोहित शर्मा उभा होता. कार्तिकचा हा फिनिशर अंदाज पाहून रोहित आनंदी झाला. त्याने येथून कार्तिकला मिठी मारली. आता हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles