5G Service : भारतात 5G सेवा सुरू झाली आहे. 1 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G सेवेचा शुभारंभ केला. Airtel 5G, Reliance Jio आणि Vi हे देशातील पहिले दूरसंचार ऑपरेटर आहेत ज्यांनी त्यांची 5G सेवा कधी उपलब्ध होतील याबद्दल सांगितले आहे. 5G सेवा संपूर्ण भारतात टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जाणार आहे. देशातील अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, पुणे, सिलीगुडी आणि वाराणसी या शहरांमध्ये सुरवातीला 5G नेटवर्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानंतर देशभरातील इतर शहरांमध्ये 5G सेवा सुरु केली जाणार आहे. Airtel, Reliance Jio आणि Vi या कंपन्यांची 5G सेवा कधी सुरु होणार आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत…Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…
एअरटेल 5G –
एअरटेलचे 5G नेटवर्क आता बंगळुरु, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, मुंबई, नागपूर, सिलीगुडी आणि वाराणसी या आठ शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे. टेलिकॉम ऑपरेटर एअरटेल कंपनी मार्च 2023 पर्यंत आणखी शहरांमध्ये 5G सेवा सुरु करेल. त्यानंतर मार्च 2024 पर्यंत एअरटेलकडून संपूर्ण भारतभर 5G सेवा उपलब्ध करुन दिली जाईल. Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल
रिलायन्स जिओ 5G –
रिलायन्स जिओची 5G सेवा दिवाळीपासून म्हणजे 24 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. रिलायन्स जिओ कंपनीकडून सर्वात आधी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई येथे 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे. तर रिलायन्स जिओची 5G सेवा डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण देशभरात उपलब्ध करून दिली जाईल. Also Read – Belly Dance Video: नोरा फतेहीला देखील मागे टाकतेय या मुलीच्या डान्स स्टेप्स, व्हिडिओवर खिळल्या नेटिझन्सच्या नजरा
Vi –
Vi ने अद्याप 5G रोलआउट टाइमलाइनबद्दल काहीच माहिती दिली नाही. असे सांगितले जात आहे की, Vi टेलिकॉम ऑपरेटर लवकरच त्याच्या 5G योजनांबद्दल अधिक माहिती देईल.
BSNL –
BSNL ने त्यांच्या 5G सेवेबद्दल सांगितले आहे. BSNLत्यांची 5G सेवा 15 ऑगस्ट 2023 पासून उपलब्ध करुन देईल.
दरम्यान, कोणत्याही दूरसंचार ऑपरेटरने त्यांचे 5G दर आणि किंमत जाहीर केलेली नाही. जिओने दावा केला आहे की त्यांचे 5G प्लॅन स्वस्त असतील. रिलायन्स जिओ देशात अल्ट्रा-परवडणारा 5G फोन लॉन्च करण्याचा विचार करत आहे. तल एअरटेलने सांगितले आहे की, एअरटेल सिम 5G तयार आहे. त्यामुळे सध्याचे 4G सिम बदलण्याची गरज नाही. Airtel ने सांगितले की, सध्यातरी 5G सेवा सध्याच्या 4G दरांवर उपलब्ध असतील. कंपनी नंतर किमतीबद्दल माहिती देईल.