25 C
New York
Tuesday, June 6, 2023

Alia Bhatt च्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर, अभिनेत्री साकारतेय ही भूमिका!

Alia Bhatt Hollywood Movie : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भट (Actress Alia Bhatt) सध्या तिच्या चित्रपटांमुळे चांगलीच चर्चेत आहे. आलिया भटचे या वर्षी आतापर्यंत तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. एक चित्रपट होत नाही तर तिचा दुसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. महत्वाचे म्हणजे तिच्या या चित्रपटांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आलिया भट या चित्रपटांच्या माध्यमातून दमदार कमाई करत आहे. बॉलिवूडनंतर आता आलिया भट हॉलिवूडमध्ये (Alia Bhatt Hollywood Movie) आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे. आलिया भटची पहिला हॉलिवूड चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.Also Read – Alia Bhatt Maternity Photoshoot : कसली हॉट दिसतेय आलिया भट्ट, मॅटेलिक गाऊनमध्ये केलं मॅटरनिटी फोटोशूट

आलिया भट्टने नुकताच तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटातील एक लूक शेअर केला आहे. ‘हार्ट ऑफ स्टोन’ असे तिच्या या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात गॅल गडॉट महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. गल गडॉट ही तीच अभिनेत्री आहे जिने ‘सुपर वुमन’ची भूमिका केली होती. या चित्रपटात आलिया काया धवन नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत जेमी डोर्नन देखील दिसणार आहे. जेमी डोर्ननने ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’मध्ये काम केले आहे. ‘हार्ट ऑफ स्टोन’मध्येही आलियाची झलक दाखवण्यात आली असून चित्रपटाचा हा लूक पाहता या चित्रपटात खूप अॅक्शन पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे. Also Read – गोल्डन आणि सिल्वर कलरच्या ड्रेसमध्ये Tamannaah Bhatia चे बोल्ड फोटोशूट!

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

Also Read – Salman Khan च्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटात होणार Ram Charan ची एन्ट्री!

आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, आलिया भटचे आतापर्यंत तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. वर्षाच्या सुरुवातीला आलियाचा ‘गंगूबाई’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खूपच कौतुक केले. या चित्रपटात अभिनेत्रीने ‘गंगूबाई काठियावाडी’ची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. या चित्रपटानंतर आलियाच्या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट ‘डार्लिंग्स’ प्रदर्शित झाला. या चित्रपटानेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आणि अलीकडेच पती रणबीर कपूरसोबत आलियाचा पहिला चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या चित्रटाने देखील दमदार कमाई केली आहे. आलिया लवकरच करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहे.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles