2.9 C
New York
Friday, December 8, 2023

Alia Bhatt आणि Ranbir Kapoor ला अ‍ॅटिट्यूट दाखवणं पडलं महागात, सोशल मीडियावर होतायेत ट्रोल!

Alia- Ranbir Trolled: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा ब्रह्मास्त्र चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट (Brahmastra Movie) चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाल्याने या चित्रपटाने बक्कळ कमाई करत कमाईचे अनेक विक्रम मोडले आहेत. अशात रणबीर आणि आलिया पुन्हा चर्चेत आले आहे.  मात्र यावेळी कारण वेगळं असून दोघेही सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहे. चाहते त्यांच्यावर नाराज असून त्याच्याविरोधात कमेंट करत आपला राग व्यक्त करत आहेत. जाणून घेऊया नेमका काय आहे कारण…Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…

ब्रह्मास्त्रच्या यशामुळे दोघेही सेलिब्रिटीज खुश आहेत. या चित्रपटाची प्रेक्षकांना देखील प्रतीक्षा होती. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर आणि आलिया देशभर फिरले. विशेष म्हणजे आलिया प्रेग्नेंट असतानाही ती फिरली. दरम्यान दोघांनी अनेक मुलाखती देत ठिकठिकाणी फोटोसेशन देखील केले. चाहत्यांचा देखील त्यांना प्रमोशन दरम्यान आणि चित्रपट रिलीज झाल्यानंतर देखील प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने पाहिल्या दिवसापासूनच कमाईचे अनेक विक्रम मोडले आहे. अशातच दोघे सेलिब्रिटीज आपल्या खासगी आयुष्यात व्यस्त झाले असताना दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!

दोघेही सोशल मीडियावर होतायेत ट्रोल!

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रणबीर आणि आलिया नुकतेच करीना कपूर खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचले होते. येथे पापाराझींनी या जोडप्याला इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी पोज देण्यास विनंती केली. मात्र दोघांनी पापाराझींच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत न थांबता तेथून निघून गेले. या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यांच्या वाईट वागणुकीमुळे ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत. Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल

सोशल मीडियावर युजर्सनी व्यक्त केला संताप

रणबीर आणि आलियाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यूजर्सनी संतप्त प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने ‘त्यांचे फोटो काढणे बंद करा’ अशी कमेंट केली. दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘जेव्हा चित्रपट आला तेव्हा ते खूप एक्सप्रेशन देत होते, आता दोन आठवडे झाले आहेत, आता ते एक्सप्रेशन देत नाहीत. एकाने तर ‘चित्रपट आला, पैसे पचला, आता भाव देणं बंद, अ‍ॅटिट्यूट सुरु’ अशी कमेंट केली आहे. रणबीर आलियाच्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत असून युजर्स प्रतिक्रिया देत आपला संताप व्यक्त करत आहे.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles