Amazon Sale 2022: Amazon Great Indian Festival Sale 2022 सुरु झाला आहे. यावर्षी, Amazon फेस्टिव्ह सेल (Festival Sale) आठ दिवस असून 30 सप्टेंबरपर्यंत आहे. या अंतर्गत ग्राहक स्मार्टफोन, टीव्ही, कॉम्प्युटर पेरिफेरल्स, स्मार्टवॉच इत्यादींवर विशेष सूट मिळवू शकतात. या ऑफर अंतर्गत Amazon ब्लूटूथ कॉलिंग फीचर आणि AMOLED डिस्प्ले असलेल्या स्मार्टवॉचवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. Amazon Pay, ICICI बँक क्रेडिट कार्ड धारकांसाठी अमर्यादित कॅशबॅकची घोषणा करण्यात आली आहे. या सेल अंतर्गत ग्राहकांना कॅशबॅक (Cash Back Offer) रिवॉर्ड्ससाठी Amazon डायमंड्स रिडीम करण्याची संधी देखील मिळेल. बँक ऑफरमध्ये SBI क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरून केलेल्या खरेदीवर 10 टक्के इन्स्टंट सूट देखील समाविष्ट आहे. जाणून घेऊया Amazon स्मार्टवॉचवर कोणत्या ऑफर्स आहेत.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…
Fire-Boltt Visionary
Fire-Boltt Visionary यात 1.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले, 368×448 पिक्सेल रिझोल्यूशन, 100 हून अधिक अॅक्टिव्ह स्पोर्ट्स मोड, व्हॉईस असिस्सटंट, BT कॉलिंग फीचर आणि याशिवाय अनेक फीचर्स आहेत. ही वॉच वॉटर प्रूफ आहे आणि SpO2 फीचर्ससह येते. या स्मार्टवॉचची किंमत 17,999 रुपये असून ऑफर अंतर्गत ही स्मार्टवॉच 3,799 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!
Noise ColorFit Ultra 2 Buzz
या स्मार्टवॉचची किंमत 6,999 असून ऑफर अंतर्गत ही स्मार्टवॉच 2,799 च्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. यात 1.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे आणि BT कॉलिंग, घड्याळाचे रिझोल्यूशन 368×448 पिक्सेल आहे. या स्मार्टवॉचमध्ये 100+ वॉच फेस समाविष्ट आहेत आणि ऑटो डिटेक्शनसह 100 स्पोर्ट्स मोड ऑफर करते. Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल
ZEBRONICS Iconic
ऑफर अंतर्गत ZEBRONICS Iconic 10,999 रुपयांऐवजी 3,099 रुपयांत उपलब्ध आहे. यात 1.9-इंचाचा AMOLED डिस्प्ले, BT कॉलिंग फीचर, व्हॉईस असिस्टंट सपोर्ट, ‘ऑलवेज ऑन डिस्प्ले’ फीचर, 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड आणि बरेच काही आहे.
TAGG Verve Connect Ultra
TAGG Verve Connect Ultra मध्ये 1.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले, BT कॉलिंग, पासवर्ड संरक्षण, 120 हून अधिक स्पोर्ट्स मोड, कॅल्क्युलेटर, इन-बिल्ट गेम्स आणि बरेच काही आहे. TAGG Verve Connect Ultra ची किंमत 9,999 असून ऑफर अंतर्गत 3,299 रुपयांत उपलब्ध आहे.
BoAt Xtend Pro
या स्मार्टवॉचमध्ये 1.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे आणि BT कॉलिंगची सुविधा आहे. 30 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल असा दावा कंपनीने केला आहे. याव्यतिरिक्त यात 100 पेक्षा जास्त वॉच फेस आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की boAt Xtend Pro मेटल स्ट्रॅपसह येतो. BoAt Xtend Pro ची किंमत 9,799 रुपये असून ऑफर अंतर्गत ही स्मार्टवॉच 2,999 रुपयांच्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे.