21.2 C
New York
Friday, September 22, 2023

Amravati Crime: अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीला सोडायला आला अन् खेळ संपला! अज्ञात जमावाकडून आरोपीची हत्या

Amravati Crime: एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या मुख्य आरोपीची हत्या करण्यात आल्याचा प्रकार अमरावतीमधून (Amravati) समोर आला आहे. या आरोपीची धारदार शस्त्राने हत्या (Murder case) आली. चांदूर (Chandur) रेल्वे शहरातील गारोडीपुरा येथील ही घटना आहे. नईम खान रहमान खान (वय 35) असे ठार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी हा प्रकार घडला. हा अपहरणकर्ता अल्पवयीन मुलीला सोडण्यासाठी मध्यरात्री तिच्या घरी आला होता. याच वेळी अज्ञात जमावाने त्याचा खून केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतचे वातावरण आहे.Also Read – Aamna Sharif Photos: आमना शरीफचा असा लूक तुम्ही कधी पाहिला नसेल, शॉर्ट्स आणि ब्रालेटमध्ये दिसतेय हॉट!

नेमके काय घडले?

गारोडीपुरा येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. 21 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास आरोपी नईम खान त्याच्या साथीदारांसह येथे आला. त्याने मुलीच्या कुटुंबियांसमोरच चाकूचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. यानंतर कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु होता. आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी देखील नातेवाईकांकडून केली जात होती. तसेच त्याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणीही परिसरातील नागरिकांकडून मागणी केली जात होती. Also Read – Walnuts Benefits: रोज खावेत 2 भिजवलेले अक्रोड, डायबिटीजसह हृदयाच्या समस्या होऊ शकतात दूर!

नातेवाईकांनी केले होते आंदोलन

अपहरण करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात यावी यासाठी अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांकडून आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक करत होते. मात्र तरी देखील आरोपीला अटक झाली नाही. याचा निषेध करत चांदूर रेल्वे पोलिस स्टेशन समोर मुलीच्या नातेवाईकांकडून आंदोलन केले जात होते. Also Read – Ponniyin Selvan Collection: ऐश्वर्या रॉय बच्चनच्या चित्रपटाची पहिल्याच दिवशी तगडी कमाई, जमवला एवढा गल्ला!

मुलीला घरी सोडायला आला अन् खेळ खल्लास

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु असतानाच शुक्रवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास मुख्य आरोपी नईम खान त्याच्या साथीदारांसोबत मुलीला तिच्या घरी सोडायला आला. त्याने मुलीला तिच्या घराजवळ सोडले आणि तो तिथून निघून गेला. मात्र याच वेळी त्याचा घात झाला. अज्ञात जमावाने नईम खानला जबर मारहाण केली. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार देखील करण्यात आले. या घटनेची माहिती मिळता पोलिस घटनास्थळी दाखल केले. पोलिसांनी आरोपीला रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी मोईन खान रहमान खान यांच्या तक्रारीवरून अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles