21.2 C
New York
Friday, September 22, 2023

Ankita Bhandari Murder Case: …म्हणून अंकिता भंडारीची केली हत्या, फेसबुक फ्रेंडमुळे हत्येमागचं गूढ उलगडलं!

Ankita Bhandari Murder Case: उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) अंकिता भंडारी हत्या प्रकरणामुळे (Ankita Bhandari Murder Case) वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता झालेल्या 19 वर्षीय अंकिता भंडारीचा मृतदेह अखेर शनिवारी पोलिसांना (Uttarkhand Police) सापडला. उत्तराखंडच्या हृषीकेशमधील भाजप नेते विनोद आर्या यांचा मुलगा पुलकित आर्या (Pulkit Aarya) याच्या ‘वनतारा’ रिसॉर्टजवळील एका कालव्यात अंकिताचा मृतदेह सापडला. अंकिताच्या हत्येप्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी आधीच पुलकित आर्या आणि त्याच्या दोन साथिदारांना अटक केली आहे. पुलकितच्या दोन्ही साथिदारांनी हत्येची कबुली दिली आहे. सध्या पुलकित आर्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.Also Read – Indonesia Football Match Violence: मृत्यूतांडव! इंडोनेशियात फुटबॉलची मॅच संपल्यानंतर दोन्ही टीमचे समर्थक आमने-सामने, हिंसाचारात 129 जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेली अंकिता भंडारी ही तरुणी पुलकित आर्याच्या रिसॉर्टमध्ये रिसेप्शनीस्ट म्हणून काम करत होती. उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील यमकेश्वर ब्लॉकमध्ये हे रिसॉर्ट आहे. पण काही दिवसांपूर्वी अचानक अंकिता भंडारी बेपत्ता झाली. अंकिता बेपत्ता झाल्यापासून पोलिसांकडून तिचा शोध सुरु होता. शुक्रवारीच ती काम करत असलेल्या रिसॉर्टचे मालक अर्थात पुलकित आर्या आणि त्याचे दोन कर्मचारी यांची पोलिसांनी चौकशी करत त्यांना अटक केली. त्यानंतर शनिवारी अंकिताचा मृतदेह रिसॉर्टजवळील एका कालव्यात सापडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. Also Read – Mumbai Local Mega Block: आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा!

याप्रकरणाचा तपास सध्या एसआयटीकडून सुरु आहे. याप्रकरणी तपास केल्यानंतर एसआयटीने नवा खुलासा केला आहे. डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितलं की, ‘मृत तरुणीने रिसॉर्टवर आलेल्या अतिथींसोबत लैंगिक संबंध ठेवावेत, म्हणून पुलकित आर्या तिच्यावर दबाव आणत होता. पीडित तरुणीने लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने आरोपींनी तिची हत्या केल्याचा खुलासा मृत तरुणीच्या एका फेसबूक फ्रेंडने केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.’ Also Read – Mumbai News : मुंबईत मेट्रोच्या कामामुळे 7 घरं कोसळली, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले!

अंकिता भंडारीची हत्या झाल्याचे उघड झाल्यानंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी पुलकित आर्याचे रिसॉर्ट पेटवून दिले. तसंच, ओबीसी आयोगाच्या उपाध्यक्षपदावरुन पुलकितच्या भावाची हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी पुलकित आणि त्याच्या दोन्ही साथिदार म्हणजेच रिसॉर्टचे मॅनेजर सौरभ भास्कर आणि सहाय्यक मॅनेजर अंकित गुप्ता यांना कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास उत्तराखंड पोलिसांकडून सुरु आहे.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles