15 C
New York
Tuesday, September 26, 2023

Atal Pension Scheme: या सरकारी योजनेत करा गुंतवणूक, निवृत्तीनंतर मिळेल 60 हजार रुपये पेंशन

Atal Pension Scheme: सध्या मोठ्या प्रमाणात वाढत असलेली महागाई आणि उत्पन्नाचे किमान स्त्रोत यामुळे अनेकांना भविष्यातील किंवा वृद्धापकाळातच्या खर्चाची (Government Pension Scheme) चिंता सतावत आहे. तुम्ही देखील तुमच्या भविष्याचा विचार करून गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला सरकारच्या अशा एका योजनेविषयी (Sarkari Pension Yojana) माहिती देत आहोत ज्यात तुम्हाला अतिशय कमी गुंतवणूक करून वृद्धाकाळात चांगली पेंशन (Investment scheme) मिळवता येईल. तुम्हाला तुमचे म्हातारपण सुरक्षित करायचे असेल तर तर हा लेख पूर्ण वाचा यात आम्ही तुम्हाला सरकारच्या अटल पेन्शन योजनेविषयी (APY) सविस्तर माहिती देत आहोत. चला तर जाणून घेऊया काय आहे अटल पेंशन योजना (Atal Pension Yojana) आणि त्यातून तुम्ही कशाप्रकारे पेंशन मिळवू शकता याबाबत.Also Read – Pension Scheme: तुमच्या नावावर आहे घर तर म्हातारपणी मिळू शकते पेंशन! करावे लागेल हे काम

काय आहे अटल पेंशन योजना?

केंद्र सरकारने 2015 मध्ये अटल पेंशन योजना सुरू केली आहे. सुरुवातीला ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुरू होती. मात्र आता या योजतनेत 18 ते 40 दरम्यान वय असलेला कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. या योजनेच्या माध्यामातून गुंवतणूकदारांना 60 वर्षांनंतर पेंशन मिळण्यास सुरुवात होते. अटल पेन्शन योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना दरमहा किंमान 1,000 रुपये आणि कमाल 5,000 रुपये पेंशन मिळू शकते. तसेच ही एक सरकारी योजना असल्यामुळे त्यात गुंतवलेले पैसे देखील सुरक्षित आहेत. कोणताही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करावी लागेल. तसेच या योजनेत गुंतवणूक करण्यासाटी तुमच्याकडे बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे. Also Read – Pension Scheme: अटल पेंशन योजनेत झाला हा मोठा बदल, आता या लोकांना उघडता येणार नाही खाते

कोण आणि कधी करू शकतो गुंतवणूक?

अटल पेंशन योजनेत कोणताही भारतीय नागरिक वयाच्या 18 व्या वर्षापासून गुंतवणूक करू शकतो. तुम्ही जेवढ्या लवकर या योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात कराल तेवढा अधिक फायदा तुम्हाला मिळतो. अदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने वयाच्या 18 व्या वर्षीच या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर वयाच्या 60 नंतर त्या व्यक्तीला मासिक 5000 रुपये पेंशन मिळू शकते. यासाठी त्या व्यक्तीला 18 व्या वर्षापासून दरमहा फक्त 210 रुपये गुंतवणूक करावी लागेल. हे लक्षात घ्या की या योजनेत गुंतवणूक करताना वेळेकडे अधिक लक्ष्य देणे आवश्यक आहे. Also Read – Atal Pension Yojana: करदात्यांना मोठा झटका, सरकारने अटल पेन्शन योजनेत केला बदल!

किती गुंतवणूकीवर किती पेंशन मिळेल?

अटल पेंशन योजनेत दररोज 7 रुपये जमा केले तर तुम्हाला 5000 रुपये मासिक पेंशन मिळेल. जर तुम्ही दरमहा 42 रुपये जमा केले तर तुम्हाला 1,000 रुपये पैसे पेंशन मिळेल. तुम्हाला दरमहा 2,000 रुपये पेंशन हवी असेल तर त्यासाठी दरमहा 84 रुपये गुंतवणूक करावी लागेल. त्याच प्रमाणे तुम्हाला दरमहा 3,000 रुपय पेंशन हवी असेल तर तुम्हाला दरमहा 126 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्हाला 4,000 रुपये पेन्शन हवी असेल तर दरमहा 168 रुपये जमा करणे आवश्यक आहे.

करातून मिळेल सवलत

अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला करात देखील सवलत मिळते. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना आयकर कायदा 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर लाभ मिळतो. यातून करपात्र उत्पन्न कापले जाते. तसेच काही केसेसमध्ये 50,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त कर लाभ देखील मिळू शकतो. याचाच अर्थ असा की या योजनेत एकूण 2 लाख रुपयांपर्यंतची कर सवलत मिळते.

गुतवणूकदाराचा मृत्यू झाला तर काय?

अटल पेंशन योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचा वयाच्या 560 वर्षापूर्वी मृत्यू झाल्यास. गुंतवणूकदाराचा जोडीदार या योजनेत पैसे जमा करणे सुरू ठेवू शकतो. तसेच 60 वर्षांनंतर दरमहा पेन्शनचा लाभ घेऊ शकतो. याशिवाय गुंतवणूकदाच्या मृत्यूनंतर त्याचा जोडीदार एकरकमी रकमेवर देखील दावा करू शकतो. जर पहिल्या नॉमिनिचाही मृत्यू झाला तर दुसऱ्या नॉमिनीला एकरकमी रक्कम मिळते.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles