1.4 C
New York
Thursday, February 22, 2024

Bigg Boss 16: साजिद खानसह हे 16 स्पर्धक करतील ‘बिग बॉस’च्या घरात धमाल, अनेक स्टार्स ठरले आहे वादग्रस्त

Bigg Boss 16: सलमान खान (Salman Khan) होस्ट करत असलेला टीव्ही जगतातील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’ (Bogg Boss) सुरू झाला आहे. शनिवारी रात्री या शोचा भव्य प्रीमियर पार पडला. यासह स्पर्धकांचे नावं ही समोर आले आहेत. या शोमध्ये सामील झालेले सर्व स्टार्स हे प्रसिद्ध असून काहींच्या एन्ट्रीने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तुम्हालाही ‘बिग बॉस 16’ च्या स्पर्धकांची नावे (Bigg Boss 16 Contestants List) जाणून घेण्याची उत्सुकता लागलीच असेल. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ते 16 स्पर्धक.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…

हे आहेत ‘बिग बॉस 16’चे स्पर्धक

‘बिग बॉस’च्या या 16 व्या सीझनमध्ये टीना दत्ता, अब्दुल रोजिक, निमरित कौर अहलुवालिया, मन्या सिंह, सौंदर्या शर्मा, शालीन भानोत, गौतम विग, MC Stan, अंकित गुप्ता, सुंबुल तौकीर,  श्रीजीता डे, शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, साजिद खान, गौरी नागोरी, अर्चना गौतम या स्पर्धकांचा समावेश आहे. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!

साजिद खानाची सरप्राईज एंट्री

‘बिग बॉस’च्या घरात प्रत्येक सीझनला कोणाची न कोणाची सरप्राईज एंट्री होत असते. त्यानुसार या सीझनमध्ये सरप्राईज एन्ट्री ठरली ती साजिद खानची. बिग बॉसच्या निमित्ताने साजिद खान या टीव्ही रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून आला आहे. यासह टीव्ही मालिका स्टार सुंबूल तौकीर खान, निमरित कौर अहलुवालिया, बिग बॉस मराठी 2 चे विजेते शिव ठाकरे आणि अब्दुल रोजिक यांसारख्या स्टार्सनीही बिग बॉसच्या घरात दाखल झाले आहे. Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल

‘छोटी सरदारनी’ स्टार निमरित कौर अहलुवालिया बिग बॉस 16 ची पहिली स्पर्धक ठरली. या अभिनेत्रीने शोमध्ये पाऊल ठेवताच बिग बॉसने तिला कप्तान केले आहे. तर तुर्कस्तानमधील YouTuber अब्दू रोजिक देखील या शोमध्ये सहभागी झाला आहे. 19 वर्षांचा अब्दू रोजिक हा एक प्रसिद्ध गायक आहे जो या शोमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आला.

यासह  ‘उदरिया’ स्टार प्रियांका चौधरी देखील बिग बॉस 16 मध्ये सहभागी झाली आहे. ती तिचा को-स्टार अंकित गुप्तासोबत येथे पोहोचली. ‘उदरिया’ स्टार अंकित गुप्ता बिग बॉस 16 चा चौथा स्पर्धक बनला आहे. याठिकाणी दोघांची क्यूट बाँडिंग पाहायला मिळाली. येथे, रॅपर आणि गायक MC Stan याने ही बिग बॉस 16 च्या घरात प्रवेश केला आहे. अभिनेत्री आणि राजकारणी अर्चना गौतमनेही ‘बिग बॉस 16’ च्या घरात प्रवेश केला आहे. या घरात पाऊल ठेवणारी ती सहावी स्पर्धक ठरली. तर अभिनेता गौतम सिंगही ‘बिग बॉस 16’मध्ये दाखल झाला आहे. यासह ‘बिग बॉस 16’मध्ये अभिनेता शालीन भानोत, सौंदर्या शर्मा, ‘इमली’ स्टार सुंबुल तौकीर खान ही शोमध्ये सहभागी झाले आहे.  सुंबुल तौकीर खान ही तिच्या वडिलांसोबत स्टेजवर दिसली. फेमिना मिस इंडिया 2020 मन्या सिंग देखील ‘बिग बॉस 16’ मध्ये पोहोचली आहे.
यासह ‘उत्तरन’ फेम स्टार टीना दत्ता देखील शोमध्ये दिसणार आहे. शोमध्ये रश्मी देसाईची ऑन-स्क्रीन मुलगी श्रीजिता डे देखील आहे. यावेळी हरियाणची शकीरा म्हणून प्रसिद्ध असलेली डान्सर गौरी नागोरी देखील बिग बॉस 16 मध्ये दिसणार आहे.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles