Breast Cancer In Men: स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) हा सामान्यतः महिलांमध्ये आढळून येतो. असे असले तरी पुरुषांनाही हा आजार होतो, मात्र याचे प्रमाण फारच कमी असते. कारण पुरुषांचे स्तन (Breast) हे महिलांच्या स्तनाप्रमाणे पूर्ण विकसित झालेली नसतात. मात्र त्यात स्तन टिशू असतात. त्यामुळे पुरुषांमध्येही स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. याला डक्ट कार्सिनोमा म्हणतात. पुरुषांच्या दूध उत्पादक ग्रंथींमध्ये (Milk Ducts) कर्करोगाची सुरुवात झाल्यास त्याला लोब्युलर कार्सिनोमा म्हणतात. फारच कमी पुरुषांमध्ये ही समस्या निर्माण होते. जगातील फक्त 1 टक्का पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोग आढळून येतो. यासंदर्भात 2015 मध्ये सुमारे 2350 नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती. त्यातील जवळपास 440 पुरुषांनी स्तनांच्या कर्करोगाने आपला जीव गमावला.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…
कोणाला असतो धोका?
- पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढण्यास अंडकोषवरील सूज देखील कारणीभूत ठरते. तसेच शस्त्रक्रियेने अंडकोष काढून टाकल्याने देखील स्तनाचा कर्करोग होऊ शकतो.
- तरुणांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. मात्र जसजसे वय वाढते तसतसा धोकाही वाढतो.
- स्तनाचा कर्करोग हा काही प्राणात अनुवांशिक आजार आहे. तुमच्या जवळच्या नातेवाईकांपैकी कोणाला स्तनाचा कर्करोग झाला असेल, तर तुम्हाला स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.
- क्लाइनफेल्टर सिंड्रोम नावाची अनुवांशिक स्थिती असलेल्या पुरुषामध्ये देखील स्तनाच्या कर्करोगाचा धोका असतो. कारण या स्थितीतील पुरुष अनेकदा जास्त प्रमाणात स्त्री संप्रेरक तयार करतात.
हे आहे लक्षणं
- पुरुषांमधील स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे ही महिलांच्या कर्करोगासारखीच असतात.
- स्तनात गाठ निर्माण होते. ही गाठ पाहू आणि अनुभवू शकतो
- एका स्तनाचा आकार वाढणे
- स्तनाग्र दुखणे
- स्तनाग्रवर फोड येणे
- उलटे स्तनाग्र
वरील लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टारांशी संपर्क साधत वैद्यकीय सल्ला घ्यावा. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!
(टीप : लेखात दिलेला सल्ला ही सामान्य आणि उपलब्ध माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करून पाहण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा) Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल