25 C
New York
Tuesday, June 6, 2023

Railway Stations: सीएसएमटीसोबतच ‘या’ रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट, पुनर्विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी!

Railway Stations: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससोबतच (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus )नवी दिल्ली आणि अहमदाबाद रेल्वे स्टेशनचा (Ahmedabad Railway Station) कायापालट होणार आहे. यासाठी 10 हजार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. स्थानकांच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावाला बुधवारी केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये हा प्रस्ताव मंजुर करण्यात आला.Also Read – Mumbai News : मुंबईमध्ये गरबा खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!

10 हजार कोटींचा आहे प्रस्ताव

दहा हजार कोटी रुपयांचा खर्च या पुनर्विकासाच्या कामामध्ये केला जाणार आहे. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या निर्णयांची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, ‘तीन रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम अडीच वर्षांत पूर्ण होईल. पुनर्विकास प्रकल्पाची निविदा प्रक्रिया 10 दिवसांत काढली जाईल. प्रकल्पात 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. पुनर्विकसित स्थानके प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवतील.’ Also Read – Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ अडचणीत, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल!

199 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामाचे प्लानिंग सुरु

मंत्री म्हणाले, देशभरातील 199 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामाचे मास्टर प्लॅनिंग सुरू आहे. 47 स्थानकांसाठी निविदा काढण्यात आल्या असून 32 स्थानकांवर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, पुनर्विकास कामांसाठी 60 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई स्थानकांच्या पुनर्विकासामुळे 35 हजार 744 नवीन नोकऱ्या निर्माण होण्यास मदत होणार आहे. Also Read – Aamna Sharif Photos: आमना शरीफचा असा लूक तुम्ही कधी पाहिला नसेल, शॉर्ट्स आणि ब्रालेटमध्ये दिसतेय हॉट!

असा आहे प्लान

📍Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT), Mumbai pic.twitter.com/V9cMMa5jpU

— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) September 28, 2022

या सुविधा असणार उपलब्ध

प्रत्येक स्थानकावर दुकाने, कॅफेटेरिया, मनोरंजन सुविधांच्या जागांसह सर्व प्रकारच्या सुविधा असतील. रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूंना स्थानकाची इमारत असेल. यामुळे शहराच्या दोन्ही बाजू या स्थानकांनी जोडल्या जातील. फूड कोर्ट, वेटिंग लाउंज, मुलांसाठी खेळण्याची जागा, स्थानिक उत्पादनांसाठी जागा आदी सुविधाही उपलब्ध असतील. शहराच्या आत असलेल्या स्थानकांना सिटी सेंटरसारखी सारखी जागा असेल. पुरेशा पार्किंगच्या सुविधेसह वाहतूक सुरळीत होण्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles