CBI Arrests Sanjay Pandey: बेकायदेशीरपणे नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Former Mumbai Police Commissioner) संजय पांडे यांना सीबीआयने अटक केली आहे. पांडे न्यायालयात हजर केल्यानंतर दिल्ली न्यायालयाने त्यांना चार दिवसांची सीबीआय कोठडी (Sanjay Pandey In CBI custody) सुनावली आहे. या प्रकरणी तपास सुरू ठेवण्यासाठी सीबीआयकडे पुरेसे कारण आहे असे न्यायालयाने म्हटले आहे.यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना एनएसई को-लोकेशन आणि फोन टॅपिंग प्रकरणात (NSE co-location and phone tapping case) अटक केली होती.Also Read – NSE Phone Tapping Case : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक, काय आहे प्रकरण?
#UPDATE | A Delhi Court grants 4-day CBI remand of Sanjay Pandey to CBI and states that CBI has sufficient grounds to proceed with the investigation https://t.co/XFZBiSmlrd
— ANI (@ANI) September 24, 2022
Also Read – ED Notice To Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीची नोटीस!
या प्रकरणात आर्थिक तपास संस्थेने गुन्हा दाखल करून संजय पांडे यांच्यासह एनएसईचे माजी प्रमुख रवी नारायण आणि चित्रा रामकृष्ण यांच्या विरुद्ध एक्स्चेंज कर्मचार्यांची गुप्तता उघड केल्याचा आरोप केला होता. जुलैमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयाला माहिती देताना सांगितले की, संजय पांडे यांनी एप्रिल 2000 मध्ये आपल्या सेवेचा राजीनामा दिला होता. 2001 ते 2006 दरम्यान त्यांच्या सेवेबाबत खटला सुरू होता. परंतु 2007 मध्ये त्यांनी VRS साठी (स्वैच्छिक सेवानिवृत्ती सेवा) अर्ज केला आणि ऑक्टोबर 2008 मध्ये त्यांनी तो मागे घेतला. Also Read – Navneet Rana यांच्या आरोपांना पोलीस आयुक्त संजय पांडे यांचं पुराव्यासह उत्तर, शेअर केला व्हिडिओ
ED ने न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार संजय पांडे यांनी 2001 मध्ये iSec सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली होती. एजन्सीच्या वृत्तानुसार संजय पांडे कार्यरत असताना ही कंपनी स्थापन झाली होती, पांडे कार्यालयीन बैठकांना उपस्थित राहत होते आणि कंपनीच्या कामकाजावर अप्रत्यक्षपणे प्रभाव पाडत होते.
काय आहे एनएसई फोन टॅपिंग प्रकरण?
एफआयआरनुसार, एनएसईचे माजी अधिकारी चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांनी एनएसई कर्मचार्यांची बेकायदेशीरपणे हेरगिरी करण्यासाठी एका खाजगी कंपनीला काम दिले. सीबीआय आणि ईडीचा विश्वास आहे की ते कर्मचारी चर्चा करत आहेत का किंवा एक्सचेंजशी संबंधित माहिती लीक करत आहेत यावर लक्ष ठेवत होते. वृत्तानुसार, संजय पांडे यांच्या iSec सर्व्हिसेस या कंपनीला सुमारे 4.45 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले. 2009 ते 2017 दरम्यान कथित स्नूपिंग घडले, एनएसईने नंतर स्नूपिंग मशीनची ई-कचरा म्हणून विल्हेवाट लावली. सीबीआयने या प्रकरणी संजय पांडे यांच्यासह मुंबई, पुणे, कोटा, लखनऊ आणि दिल्ली-एनसीआरमधील 18 आरोपींच्या घरांचीही झडती घेतली.