14.5 C
New York
Saturday, September 30, 2023

Chanakya Niti : पुरुषांनो काही गोष्टी लपवलेल्याच बऱ्या… अनथ्या गमवून बसाल विश्वासार्हता

Chanakya Niti: आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे आपल्या चाणक्य नीतीसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी कूटनीती, राजकारण, अर्थशास्त्राप्रमाणे व्यक्तीच्या व्यवहारिक जीवनाविषयी देखील महत्त्वाच्या गोष्टी (Chanakya Niti For Happy Life) सांगितल्या आहेत. चाणक्य नीतीत त्रास, अपमान, नुकसान टाळण्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचे पालन करून व्यक्ती यशस्वी, सन्माननीय जीवन जगू शकतो.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…

चाणक्य नीतीमध्ये महिला आणि पुरुषांसाठीही महत्त्वाच्या गोष्टी (Chanakya Tips) सांगितल्या आहे. त्यांचे पालन न केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता. चाणक्य नीतीमध्ये पुरुषांना त्यांचे काही रहस्य नेहमी गुप्त ठेवण्यास सांगितले आहे. या गोष्टी उघडकीस आल्यास अपमानाचा सामना करावा लागू शकतो. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!

या गोष्टी ठेवा गुप्त

  1. तुमचे तुमच्या पत्नीशी भांडण झाले असेल किंवा तुमच्या दोघांची काही खासगी बाब असेल तर या गोष्टी तुमच्या जवळच्या मित्रालाही सांगू नका. आपल्या पत्नी आणि स्वतःमधील गोष्टी इतरांना सांगणे हे निंदाचे कारण बनते. यामुळे पती-पत्नी दोघांचाही आदर नष्ट होतो.
  2. तुमचा कधी अपमान झाला तर ही बाब कोणाला सांगू नका. तुमचा अपमान इतरांना सांगून तुमचा उरलेला सन्मानही नष्ट होतो. त्यामुळे मित्र किंवा कुटुंबातील सदस्य कितीही चांगला असला तरी त्याला आपल्या अपमानाबाबत सांगू नका.
  3. तुमच्या आर्थिक स्थिती आणि धन बाबत कोणालाही सांगू नका. अनेक प्रकारच्या संकटांशी लढण्यासाठी पैसा उपयोगी ठरू शकतो. जर तुमच्याकडे खूप पैसे असतील आणि तुम्ही ही गोष्ट तुमच्या जवळच्या लोकांना सांगितली तर ते लोकं तुमचा पैसा हडपण्याचा प्रयत्न करतील. साहजिकच पैशांअभावी तुमचा अपमान होऊ शकतो.
  4. या जगात प्रत्येकजण दुर्बल व्यक्तीला दाबण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुमची कमतरता कोणाला सांगू नका. असे केल्याने तुमचा त्रास कमी होण्याऐवजी वाढेल. तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन लोक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील.

(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.) Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles