CM Eknath Shinde: राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट (CM Eknath Shinde Threatened) रचण्यात आल्याचीही माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे आता सर्व यंत्रणांना सतर्क झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही महिन्यांपूर्वी माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री असताना शिंदे यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांना स्फोट घडवून उडवून देण्याचा कट रचला जात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…
महिनाभरापूर्वीच मंत्रालयातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात त्यांना जीवे मारण्याचे धमकी देणारे पत्र आले होते. त्यानंतर धमकीचा एक निनावी फोन देखील आला होता अशी माहिती समोर आली आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांना कोणी धमकी दिली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, आत्मघाती स्फोट घडवून मुख्यमंत्र्यांना उडवून देण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळालेली आहे. Also Read – CM Death Threats Fake Call : फक्त 5 रुपयांसाठी केला कॉल…, मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याबाबत माहिती देणाऱ्याला अटक!
दरम्यान गुप्तचर विभागाला मिळालेल्या संवेदनशील माहितीमुळे सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे आणि निनावी फोनवरून धमकी देण्यात आल्यानंतर गुप्तचर विभागाने या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. या तपासादरम्यान आता गुप्तचर विभागाला स्फोट घडवून मुख्यमंत्र्यांना उडवून देण्याचा कट रचला जात असल्याची महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या माहितीमुळे सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. Also Read – Maharashtra Cabinet Decision : राज्य सरकारची मोठी घोषणा ! 20 हजार जागांसाठी होणार पोलिस भरती तर…