Corn Benefits: मक्याचे कणीस (Corn) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर (Health benefits) असते. अनेक पोषक तत्वांनी युक्त मका आरोग्याशी (Health tips) संबंधित अनेक समस्या दूर करण्यात मदत करते. मक्यामध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फायबर, झिंक इत्यादी पोषक घटक असतात. जे शरीरातील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करण्यास मदत करतात. मक्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत (Strong bones)होतात. मका अॅनिमियापासून बचाव करण्यासही मदत करते. चला तर मग जाणून घेऊया मक्याचे सेवन करण्याचे आरोग्य फायदे…Also Read – Aamna Sharif Photos: आमना शरीफचा असा लूक तुम्ही कधी पाहिला नसेल, शॉर्ट्स आणि ब्रालेटमध्ये दिसतेय हॉट!
डोळ्यांसाठी फायदेशीर
मक्यामध्ये कॅरोटीनॉइड ल्युटीन आणि जेक्सॅन्थिन सारखे आवश्यक अँटिऑक्सिडंट असतात. हे ऑप्टिक टिश्यूमधून हानिकारक फ्री रॅडिकल्स काढून टाकते आणि दृष्टी सुधारते. यासोबतच ते डोळ्यांच्या नाजूक भागांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. ते ग्लूकोमा आणि मोतीबिंदू यांसारख्या वयासोबतच होणाऱ्या रोगांपासून देखील संरक्षण करते. Also Read – Walnuts Benefits: रोज खावेत 2 भिजवलेले अक्रोड, डायबिटीजसह हृदयाच्या समस्या होऊ शकतात दूर!
हाडे मजबूत करते
मक्यामध्ये नैसर्गिक कॅल्शियम असते जे हाडे मजबूत करण्याचे काम करते. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि किडनीच्या समस्यांवरही हे फायदेशीर आहे. तरुण लोक रोज मक्याचे सेवन करू शकतात परंतु मध्यमवयीन आणि वृद्ध लोकांनी तो मर्यादित प्रमाणात खावे. Also Read – Ponniyin Selvan Collection: ऐश्वर्या रॉय बच्चनच्या चित्रपटाची पहिल्याच दिवशी तगडी कमाई, जमवला एवढा गल्ला!
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवते
कॉर्नमध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स शरीराला लगेच ऊर्जा देण्याचे काम करतात. यामध्ये असलेले फायटेट्स, टॅनिन, पॉलीफेनॉल सारखे घटक पचनक्रिया मंद करते. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. मधुमेही रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे. कॅलरीजचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे वजन कमी करण्यातही ते खूप प्रभावी आहे.
एनिमियापासून बचाव करते
भारतातील बहुतेक महिला, पुरुष आणि मुलांमध्ये आयरनची कमतरता आढळते. यामुळे लवकर थकवा येतो आणि प्रोडक्टिविटीचे प्रमाण कमी होते. ज्या लोकांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी कमी आहे त्यांच्यासाठी हे औषध म्हणून काम करते. हे अशक्तपणावर प्रभावीपणे उपचार करते. कॉर्नमध्ये भरपूर प्रमाणात आयरन असते.
हृदयासाठी फायदेशीर
मक्क्यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि सोडियम अजिबात नसते. मक्क्याच्या पीठापासून तयार केलेले पदार्थ हृदय रोग असणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर असते. यासोबतच यामध्ये आढळणारे फायबर आणि व्हिटॅमिन गुड कोलेस्ट्रॉल वाढवते आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते. हे हृदयाच्या वाहिन्यांमध्ये चरबी जमा होण्यास प्रतिबंध करते आणि स्नायूंचे कार्य सोपे करते. अशा अनेक कारणांमुळे मका हृदयासाठी खूप फायदेशीर आहे.
अँटी एजिंगचे काम करते
कॉर्न हे फिनोलिक अॅसिड आणि फ्लेव्होनॉइड्सपासून बनलेले असतात. हे दोन्ही अँटिऑक्सिडंट फ्री रॅडिकल्सची समस्या दूर करतात. ते त्वचेच्या नवीन पेशी तयार करण्यासाठी तसेच फाइन लाइन्स आणि सुरकुत्या लपवण्यासाठी कार्य करतात. याचे सेवन केल्याने शरीरात कोलेजन तयार होते, ज्यामुळे त्वचा मुलायम आणि गुळगुळीत राहते.
(टीप : लेखात दिलेला सल्ला ही सामान्य आणि उपलब्ध माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करून पाहण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा)