Dadasaheb Phalke Award: ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आशा पारेख यांच्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी ही घोषणा (Award, Dadasaheb Phalke Award for 2020) केली आहे. वृत्तसंस्था एएनआयने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हवाल्याने यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख (Veteran Asha Parekh) यांना दिला जाणार असल्याचे म्हटले आहे. आशा पारेख यांनी अभिनयातून निवृत्ती घेतली असली तरी साठ आणि सत्तरच्या दशकातील त्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी आपल्या अभिनयाच्या काळात चित्रपट सृष्टीत राज्य केले. त्या काळी आशा पारेख या सर्वाधिक मानधन घेणार्या अभिनेत्री होत्या. दरम्यान 1992 मध्ये त्यांना चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.Also Read – Asha Parekh's Career: 60 च्या दशकात सर्वाधिक वेतन घेणाऱ्या अभिनेत्री आहेत आशा पारेख, अशी आहे कारकिर्द
Asha Parekh to be conferred with Dadasaheb Phalke Award, investiture on Friday
Read @ANI Story | https://t.co/cbRGvyJHbw#AshaParekh #DadasahebPhalkeAward pic.twitter.com/i4wLly0oDl
— ANI Digital (@ani_digital) September 27, 2022
भारतीय चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च सन्मान
दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान आहे. भारतीय चित्रपटांचे जनक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांच्या नावाने दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. गेल्या वर्षी दाक्षिनात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांता हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. त्यानंतर या वर्षी जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यापूर्वी राज कपूर, यश चोप्रा, लता मंगेशकर, मृणाल सेन, अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. देविका राणी ही पहिली विजेती होती असती आणि अभिनेता रजनीकांत हे गेल्या वर्षी या पुरस्काराचे मानकरी ठरले होते. Also Read – "एक पल का जिना" गाण्यावर आशा भोसलेंचा स्टेप-टू-स्टेप डान्स, चाहते झाले आवाक!
दहाव्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण
आशा पारेख यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले आहेत. त्यांनी बॉलिवूडला एका नव्या उंचीवर नेले आहे. त्या हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात प्रभावी अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. त्यांची चित्रपट कारकीर्द 1960 ते 1970 च्या दरम्यान शिखरावर होती. आशा पारेख यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी त्यांनी बिमल रॉय यांच्या ‘मा’ (1952) चित्रपटात भूमिका साकारली होती. त्यानंतर 1954 मध्ये त्यांनी बाप बेटी चित्रपटातही बाल कलाकाराची भूमिका साकारली होती. यानंतर त्यांनी काही काळासाठी अभ्यास पूर्ण करण्यासाठी ब्रेक घेतला आणि त्यानंतर त्या मुख्य अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत पुन्हा परतल्या. मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांचा पहिला चित्रपट ‘दिल देके देखो’ (1959) होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत शम्मी कपूर होते. नासिर हुसैन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.