8.9 C
New York
Saturday, December 9, 2023

Dinesh Karthik: सर्वोत्तम मॅच फिनिशर ठरला दिनेश कार्तिक, म्हणाला – ‘या’ एका गोष्टीमुळे मी शेवटी चांगला खेळू शकलो!

Dinesh Karthik: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना नागपुरात (Nagpur) खेळला गेला. भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट राखून पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताच्या या विजयात कर्णधार रोहित शर्माने (Rohit sharma) महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने 20 चेंडूत नाबाद 46 धावांची नाबाद खेळी खेळली. तर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) अवघ्या 2 चेंडूत 10 धावा करून सामना जिंकून घेतला. परफेक्ट फिनिशरची भूमिका त्याने निभावली. मात्र यावेळी त्यांच्या मनात नेमके काय सुरु होते हे त्याने सामना संपल्यानंतर सांगितले आहे. कोणत्या कारणामुळे तो सामना जिंकू शकला हे त्यांनी सांगितले आहे.Also Read – India vs South Africa, 2nd T20I: भारताने आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा मायदेशात जिंकली टी-20 मालिका, रोहित शर्माने रचला इतिहास

कार्तिकने असा जिंकवून दिला सामना

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सातव्या षटकात बाद झाल्यानंतर संघ चिंतेत दिसत होता. पण सहाव्या क्रमाने फलंदाजीला आलेला सर्वोत्तम फिनिशर कार्तिकने सहज भारताला विजय मिळवून दिला. तो फलंदाजीला आला तेव्हा भारताला विजयासाठी 6 बॉलमध्ये 9 धावांची गरज होती. यावेळी कार्तिकने ऑस्ट्रेलियासाठी शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या डॅनियल सॅम्सवर निशाणा साधला. त्याने 29 वर्षीय अष्टपैलू खेळाडूच्या षटकात पहिल्या लेग साइडमध्ये शानदार षटकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर शानदार चौकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिकने भारतीय संघासाठी एकूण दोन चेंडूंचा सामना केला. यादरम्यान त्याने 500.00 च्या स्ट्राइक रेटने नाबाद 10 धावा काढल्या. यादरम्यान कार्तिकच्या बॅटमधून एक चौकार आणि एक जबरदस्त षटकार निघाला. Also Read – IND vs SA ODI Series: वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! रोहितऐवजी हा खेळाडू असेल कर्णधार

या कारणामुळे खेळली शानदार खेळी

दिनेश कार्तिकने दोन बॉलमध्ये सामना जिंकवून दिल्यानंतर मॅच फिनिशर म्हणून त्याचे कौतुक केले जात आहे. मात्र हा सामना खेळताना त्याच्या मनात काय सुरु होते आणि तो चांगली खेळू का करु शकला याचे कारण त्याने सामन्यानंतर सांगितले. ‘अखेरचे षटक हेझलवूड टाकेल असे त्याला वाटत होते. मात्र तो न येता डॅनियल सॅम्म तिथे आला. मात्र तरीही त्याने मनात फक्त सामना जिंकायचा हे कायम ठेवले आणि आपल्या त्याच रणनितीवर तो कायम राहिला. याच मुळे तो सामना जिंकवून देऊ शकला. ठरवल्या प्रमाणे त्याने दोनच चेंडूंमध्ये भारताच्या पदरात विजय टाकला. देशाला विजय मिळवून दिल्याचा अभिमान असल्याचे तो म्हणाला.’ Also Read – India vs South Africa, 2nd T20I: भारताने 16 धावांनी जिंकला दुसरा सामना, मालिकाही 2-0 ने खिशात

सामना 8-8 षटकांचा होता

खराब हवामान आणि मैदान ओले असल्यामुळे सामना प्रति डाव आठ षटकांचा करण्यात आला होता. भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या मॅच-विनिंग धमाकेदार खेळीने प्रेक्षकांचे टी-20 सामन्याचे पैसे वसूल झाले. मॅथ्यू वेड (43) आणि कर्णधार अ‍ॅ​​​​​​​रॉन फिंच (31) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने पाच बाद 90 धावा केल्या. रोहितच्या धडाकेबाज खेळीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या सहा विकेट्सच्या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles