Drishyam 2: बहचर्चित बॉलीवूड चित्रपट दृश्यमचा (Drishyam) दुसरा पार्ट लवरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) आगामी ‘दृश्यम 2’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पुढील महिन्यात हा चित्रपट (Drishyam 2) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच अजय देवगणने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दृश्यम 2चा टीझर शेअर केला होता. त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. मात्र आज 2 ऑक्टोबरनिमित्त निर्मात्यांनी चित्रपटाच्या (Drishyam 2 movie) प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांना एक खास भेट दिली आहे.Also Read – Shriya SaranTopless: दृश्यम 2 ची अभिनेत्री श्रिया सरनने केले टॉपलेस फोटोशूट, फोटो पाहून चाहते आवाक!
सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत असलेला अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त तिकिटांच्या किमती कमी केल्या होत्या, त्याचप्रमाणे आता ‘दृश्यम 2’च्या निर्मात्यांनी या चित्रपटाचे आगाऊ बुकिंगसाठी तिकीट कमी केले आहे. 2 ऑक्टोबरला म्हणजेच आज चित्रपटाचे तिकीट घेतल्यास त्यावर 50 टक्के सवलत मिळणार आहे. म्हणजेच आज ‘दृश्यम 2’चे तिकीट बुक केल्यास ओपनिंग डेचं तिकीट अर्ध्या किमतीत मिळणार आहे. Also Read – National Film Awards 2022 : राष्ट्रपतींच्या हस्ते 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान, पाहा पुरस्कार विजेत्यांची यादी
TEAM 'DRISHYAM 2' OFFERS 50% DISCOUNT ON FILM TICKETS ON RELEASE DAY… #Drishyam2 makers tie up with multiple chains to offer 50% discount for the release day [18 Nov 2022], *if* tickets are booked on 2 Oct 2022… Stars #AjayDevgn as #VijaySalgaonkar. pic.twitter.com/OACqDzpv1j
— taran adarsh (@taran_adarsh) October 2, 2022
Also Read – Thank God चा जबरदस्त ट्रेलर रिलीज, चित्रगुप्त होऊन Ajay Devgn घेणार Sidharth Malhotra च्या कर्माचा हिशोब!
2015 मध्ये आलेल्या ‘दृश्यम’ चित्रपटात 2 ऑक्टोबर ही तारीख अतिशय खास दाखवण्यात आली होती. या चित्रपटात वारंवार या तारखेचा उल्लेख करण्यात आला होता. याच तारखेभोवती चित्रपटाची कथा फरत होती. त्यामुळे निर्मात्यांनी आजच्या तारखेला म्हणजेच 2 ऑक्टोबरला प्रेक्षकांना खास भेट दिली आहे. आज बुक केल्यास ओपनिंग डे शोचे तिकीट अर्धा किमतीत मिळणार आहे. विशेष म्हणजे हा पहिलाच चित्रपट आहे ज्याच्या पहिल्या दिवसाची आगाऊ बुकिंग अशा खास ऑफरसह सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी काही अटीही घालण्यात आल्या आहेत. या अटींनुसार हा चित्रपट 18 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पहिल्या दिवशी म्हणजेच 18 नोव्हेंबरचेच तिकीट बुक करावे लागणार आहे. तसेच ही ऑफर फक्त आजच्या दिवसच असणार आहे.
या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात अजय देवगण विजय साळगावकरच्या भूमिकेत आहे आणि ‘दृश्यम 2’मध्ये पहिला भागातील हत्या प्रकरणाची फाईल पुन्हा एकदा ओपन होणार आहे. या चित्रपटात तब्बू, इशिता दत्ता, अक्षय खन्ना, रजत कपूर आणि श्रिया सरन हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. एक कुटूंब प्रमुख असेला व्यक्ती आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी काय करु शकतो हे पहिल्या भागात दाखवण्यात आले होते. परंतु आता दुसऱ्या भागात म्हणजेच ‘दृश्यम 2’मध्ये या कथेला कसे वळण मिळणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.