Shani Sade Sati: ज्योतिषशास्त्रात (Jyotish Tips) शनी ग्रहाला प्रभावशाली ग्रह मानले जाते. तसेच शनीला न्याय देवता (Shani Dev) असे संबोधले जाते. शनिदेव व्यक्तीच्या चांगल्या कर्माचे चांगले फळ देतात तर वाईट कर्म करणाऱ्यांना दंड देखील देतात. शनीची आवडती राशी कुंभ राशीवर साडेसातीचा (Shani Sade Sati Effect) जास्त प्रभाव आहे. यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तीच्या जीवनात अडचणी निर्माण होत आहेत. चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीच्या लोकांना साडेसातीचा कोणता टप्पा सुरू आहे आणि या संकटापासून त्यांना कधी दिलासा मिळेल.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…
शनीची सद्यस्थिती
शनीच्या प्रत्येक हालचालींचा सर्वच राशींवर परिणाम होतो. काहींना हे परिणाम शुभ असतात तर काहींना यामुळे खूप अडचणींचा सामना करावा लागतो. त्यानुसार कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतर शनीने 12 जुलै 2022 रोजी मकर राशीत पुन्हा प्रतिगामी अवस्थेत प्रवेश केला. 17 जानेवारी 2023 रोजी शनि पुन्हा कुंभ राशीत परत येईल. शनीच्या या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या लोकांना त्रास होईल. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!
कुंभ राशीवर साडेसातीचा दुसरा टप्पा
शनी ग्रहाने 29 एप्रिल 2022 रोजी आपली राशी बदलली होती. 29 एप्रिल रोजी शनीने मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला होता. यानंतर कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीत सर्वात जटील म्हणजेच दुसरा टप्पा सुरू झाला होता. पुढील अडीच वर्षे शनी कुंभ राशीत राहील. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात अडचणी वाढणार आहे. साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात व्यक्तीला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी शनिदेवाशी संबंधित उपाय केले पाहिजे. Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल
2028 मध्ये होईल साडेसातीतून मुक्ती
शनी मकर राशीत असल्यामुळे सध्या धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना शनीची साडेसाती सुरु आहे. तर मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांवर शनीची महादशा सुरु आहे. कुंभ राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती 24 जानेवारी 2022 पासून सुरू झाली. यापासून त्यानं 03 जून 2027 रोजी दिलासा मिळेल. परंतु कुंभ राशीच्या लोकांची शनीची महादशा 23 फेब्रुवारी 2028 पर्यंत आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना 23 फेब्रुवारी 2028 रोजी शनीच्या साडेसातीपासून पूर्णपणे दिलासा मिळेल.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)