4.9 C
New York
Friday, December 1, 2023

Dussehara Melava 2022 : हायकोर्टाचा मोठा निर्णय! शिवाजी पार्कवर उध्दव ठाकरे यांच्याच शिवसेनेचाच ‘आवाज’ घुमणार

Dussehara Melava 2022 : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून (Shiv Sena Dussehara Melava) शिवसेना पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटातला संघर्ष दिवसेंदिवस वाढत होता. मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी हायकोर्टाने उध्दव ठाकरे यांना कोर्टाने परवानगी दिली आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. हायकोर्टाचा निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला (CM Eknath Shinde Gut) हा मोठा धक्का मानला जात आहे.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…

दसरा मेळावा उध्दव ठाकरेंचाच असा स्पष्ट निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर यंदा शिवसेनेचाच आवाज घुमणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या 5 ऑक्टोबरला शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. 2 ते 6 ऑक्टोबरपर्यंत शिवाजी पार्क वापरण्याची शिवसेनेला मुभा देण्यात आली आहे. तर कायदा-सुव्यवस्थेची शिवसेनेने हायकोर्टात हमी दिली आहे. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!

शिवसेनेत मोठी बंडाळी झाल्यानंतर दोन गट पडले आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कवर (Shivaji Park) यंदा दसरा मेळाव्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली होती. विशेष म्हणजे त्यावरून मुंबईसह राज्यात राजकारण देखील चांगलंच तापलं होतं. Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल

हायकोर्टात गेला होता वाद…

येत्या 5 ऑक्टोबरला दसरा आहे. विजया दशमीला दसरा मेळावा घेण्याची शिवसेनेची प्राचीन परंपरा आहे. असे असताना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाने देखील अर्ज केला होता. त्यामुळे महापालिकेने ठाकरे गटाचा अर्ज राखून ठेवला होता. मात्र, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेने हायकोर्टात धाव घेतली होती. न्यायमूर्ती आर.डी.धनुका, कमल खाता यांच्या द्विसदस्यीय न्यायपीठासमोर सुनावणी अखेर यात शिवसेनेलाच यश मिळाले आहे. हायकोर्टाने उध्दव ठाकरे यांना दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे.

दोन्ही गटात काय झाला युक्तीवाद?

शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा ठाकरे गट घेणार की शिंदे गट घेणार या वादावर शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी झाली. दोन्ही गटाकडून युक्तीवाद करण्यात आला. शिंदे गटाच्यावतीने आमदार सदा सरवनकर यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. आमदार सदा सरवणकर यांच्याबाजुने वकील जनक द्वारकादास यांनी कोर्टात युक्तीवाद केला. तर ठाकरे गटाच्यावतीने आस्पी चिनॉय यांनी बाजू मांडली. दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरसमुळे गेल्या दोन वर्षे दसरा मेळावा होऊ शकला नाही. शिवसेनेचे पदाधिकारी अनिल देसाई (Anil Desai) यांनी महापालिकेकडे रितसर अर्ज करून परवानगी मागितली होती. विशेष म्हणजे शिवसेनेने पहिला अर्ज केला होता. मात्र, कायदा-सुव्यवस्थेचं कारण पुढे करत महापालिकेने परवानगी नाकारली होती.

मुंबई महापालिकेने घेतला होता आक्षेप…

दसऱा मेळाव्यावरून सुरू असलेल्या ठाकरे आणि शिंदे गटातच्या संघर्षात मुंबई महापालिकेने देखील हस्तक्षेप केला होता. महापालिकेच्या तीने वकिल मिलिंद साठे यांनी कोर्टात युक्तीवाद केला. वकिल मिलिंद साठे म्हणाले, शिवाजी पार्क ते शांतता झोनमध्ये मोडते. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यास परवानगी दिल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महापालिकेने कोणालीही परवानगी दिली नव्हती.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles