4.9 C
New York
Friday, December 1, 2023

Dussehra 2022 : रावणाच्या दहनाची राख तुम्हाला करेल श्रीमंत, त्यासाठी करा हे सोपे उपाय!

Dussehra 2022 : दसऱ्याचा सण (Dussehra 2022) वाईटावर चांगल्यांच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. हा सण दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षाच्या दहाव्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, या पवित्र दिवशी भगवान श्री रामाने रावणाचा (Ram and Ravan) आणि आई दुर्गाने (Durga Mata) महिषासुराचा (Mahishasur) वध केला. त्यानंतर हा दिवस पवित्र सण म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. याला विजय-दशमी (Vijayadashmi) असे देखील म्हटले जाते. हिंदू धर्मात ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते. रावणाचे दहन (Ravan Dahan) दसऱ्याच्या रात्री केले जाते. अशामध्ये आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत जे दसऱ्याच्या दिवशी केल्यामुळे तुम्हाला फायदा होईल. यासाठी तुम्हाला रावणाच्या दहनानंतर राहिलेल्या राखेचा वापर करायचा आहे. हे नेमके उपाय काय आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत…Also Read – Dussehra 2022: दसरा का साजरा केला जातो? काय आहे दसऱ्याचे महत्त्व, या तीन गोष्टी करा दान

रावण दहनानंतर हे उपाय नक्की करा –

– विजयादशमीच्या शुभदिनी दृष्टाचे प्रतीक असलेल्या रावणाचा पुतळा जाळला जातो. रावण दहन झाल्यानंतर राहिलेली राख तुम्ही घरी घेऊन या. ही राख मोहरीच्या तेलात मिक्स करुन घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हे तेल शिंपडा. असे मानले जाते की, यामुळे घरात असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होते. Also Read – Dussehra 2022 Upay : यंदा दसऱ्याला करून पाहा हे उपाय, शत्रुवर मात करून प्रत्येक क्षेत्रात होईल तुमचा विजय

– रावणाचे दहन केल्यानंतर त्याची राख एका कागदात ठेवा आणि ही कागदाची पुडी तिजोरीत ठेवा. असे केल्यामुळे लक्ष्मी मातेचा अपार आशीर्वाद मिळतो आणि तिजोरी कधीही रिकामी होत नाही. हे उपाय करताना हे लक्षात ठेवा की हे उपाय एकट्याने करा. हे करत असताना कोणी पाहणार नाही ना याची काळजी घ्या तरच हा उपाय यशस्वी होईल. Also Read – Dussehra 2022 : दसरा कधी 4 की 5 ऑक्टोबरला?, जाणून घ्या योग्य तारीख आणि रावण दहनाची अचूक वेळ!

दसऱ्याला या गोष्टी करणं मानलं जातं शुभ –

– दसऱ्याच्या दिवशी अस्त्र-शस्त्रांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे शत्रांपासून सुटका मिळते. यासह, प्रगतीचे मार्ग देखील खुले होतात.

– या विशेष सणाच्या दिवशी अष्टकमल किंवा घराच्या कोपऱ्यात रांगोळी काढल्याने आई लक्ष्मीचे अपार आशीर्वाद मिळतात. घरात सकारात्मक ऊर्जा फिरते. यासह, अन्न आणि पैसा अबाधित राहतो.

– दसऱ्याच्या दिवशी पान खाणे अत्यंत शुभ मानले जाते. याचे सेवन केल्याने वैवाहिक जीवनात गोडवा येतो. यासोबतच वैवाहिक जीवनात सुख, शांती आणि आनंद कायम राहतो.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles