Dussehra 2022: हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी दसरा हा एक महत्त्वाच सण (Significance of Dussehra) आहे. दरवर्षी अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दसरा (Why is Dussehra celebrated) अतिशय उत्साहात साजरा केला जातो. यालाच विजयादशमी देखील म्हटले जाते. यंदा दसरा किंवा विजयादशमी 05 ऑक्टोबर 2022 रोजी ( Dussehra 2022 Importance) आहे. या दिवशी रावण दहन आणि शस्त्र पूजा केली जाते. याशिवाय या दिवशी दुर्गा देवी, प्रभू श्रीराम, श्री गणेश यांची देखील पूजा (Dussehra 2022 Shubh Muhurta) करण्याचीही परंपरा आहे.Also Read – Dussehra 2022 : रावणाच्या दहनाची राख तुम्हाला करेल श्रीमंत, त्यासाठी करा हे सोपे उपाय!
या तीन गोष्टींची करा दान
याशिवाय विजयादशमीला हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. या दिवशी सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. याशिवाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. दसऱ्याच्या दिवशी झाडू, अन्न आणि वस्त्र या तीन गोष्टींचे दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख संपत्तीची कमतरता भासत नाही असे मानले जाते. Also Read – Dussehra 2022 Upay : यंदा दसऱ्याला करून पाहा हे उपाय, शत्रुवर मात करून प्रत्येक क्षेत्रात होईल तुमचा विजय
गुप्त दानालाही अतिशय महत्त्व
दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्री राम यांनी दशानन रावनाचा वध केला होता अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच नऊ रात्री आणि दहा दिवसांच्या युद्धानंतर दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला होता अशी देखील धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे दसरा हा अधर्मावर धर्माचा विजय मिळवण्याचा दिवस मानला जातो. याशिवाय हा दिवस आनंद आणि समृद्धी घेऊन येणारा मानला जातो. या दिवशी गुप्त दान करण्याचे खूप महत्त्व आहे. धार्मिक मान्यतांनुसार या दिवशी गुप्त दान केल्याने देवी लक्ष्मी भक्तांवर प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते. Also Read – Dussehra 2022 : दसरा कधी 4 की 5 ऑक्टोबरला?, जाणून घ्या योग्य तारीख आणि रावण दहनाची अचूक वेळ!
सीमोल्लंघन म्हणजे काय?
पूर्वीच्या काळी योद्धे महत्त्वाच्या मोहिमेचा शुभारंभ दसऱ्याला करतात. महत्त्वाच्या लढाईसाठी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर निघण्याची प्रथा होती. याशिवाय अनेक व्यापारी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर विदेशात जाऊन व्यापार करायचे. यामुळेच दसऱ्याला सीमोल्लंघनाचा दिवस म्हणून ओळखण्यास सुरुवात झाली. दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकरी नवं पीक घरात घेऊन येतात.
दसरा कधी साजरा करावा?
यावर्षी दशमी तिथी 04 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:20 वाजता सुरू होईल आणि 05 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार दसरा 05 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल.