15 C
New York
Tuesday, September 26, 2023

FCI Recruitment 2022 : भारतीय खाद्य निगममध्ये 5043 पदांसाठी बंपर भरती, जाणून घ्या अधिक माहिती!

FCI Recruitment 2022 : नोकरीच्या शोधामध्ये (Job Search) असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय खाद्य निगमने (Food Corporation of India) विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. तब्बल 5,043 पदांसाठी ही बंपर भरती (FCI Recruitment 2022 ) केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते एफसीआयने (FCI) जारी केल्या अधिकृत अधिसूचनेनुसार ऑनलाइन अर्ज पाठवावा.Also Read – Job Search 2022 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती, इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्यांनी करा अर्ज!

भारतीय खाद्य निगममध्ये पाच हजारांपेक्षा जास्त जागांसाठी भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत पोस्ट – AG-III (यामध्ये तांत्रिक, सामान्य, खाते, डेपो यांचा समावेश आहे.), जेई (सिव्हिल), हिंदी टायपिस्ट AG-II, स्टेनो ग्रेड II या विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु असून 5 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. Also Read – SAIL Recruitment 2022 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 333 विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या सविस्तर माहिती!

FCI Recruitment 2022 : महत्वाच्या तारखा –

अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 5 ऑक्टोबर 2022 Also Read – India Post Recruitment 2022 : आठवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सूवर्ण संधी, आजच करा अर्ज  

FCI Recruitment 2022 : शैक्षणिक पात्रता –

– AG-III (तांत्रिक) – या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कृषी/वनस्पतीशास्त्र/जीवशास्त्र/बायोटेक/फूड यामध्ये पदवीधर असावा.

– AG-III (सामान्य) – या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवीधर असावा. तसंच संगणकाचं ज्ञानही आवश्यक आहे.

– AG-III (खाते) – या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बी. कॉमची पदवी असावी. तसंच त्याला संगणकाचे ज्ञान असावे.

– AG-III (डेपो) – या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असावा. तसंच त्याला संगणकाचे ज्ञान असले पाहिजे.

– JE (EME) – या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 1 वर्षाच्या अनुभवासह EE/ME अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा डिप्लोमा केलेला असावा.

– जेई (सिव्हिल) – या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारला 1 वर्षाच्या अनुभवासह सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी किंवा डिप्लोमा केलेला असावा.

– हिंदी टायपिस्ट AG-II – या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असावा. तसंच हिंदी टायपिंगमध्ये 30 शब्द प्रति मिनिट वेग असावा. तसंच भाषांतराचा एक वर्षाचा अनुभवही असावा.

– स्टेनो ग्रेड-II – या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असावा. त्याला टायपिंग आणि स्टेनोचे कामही करता आले पाहिजे.

FCI Recruitment 2022 : वयोमर्यादा –

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 21 वर्षे तर कमाल वय 28 वर्षे असणे गरजेचे आहे.

FCI Recruitment 2022 : अधिक माहितीसाठी –

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी fci.gov.in या वेबसाईटवर जाऊन current recruitment वर क्लिक करावे. 3 सप्टेंबरच्या जाहिरातीवर क्लिक करावे. advertisement download करावी. यामध्ये त्यांना या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती वाचायला मिळेल.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles