Funny Video: इंटरनेटवर दररोद नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. येथे अनेक जण आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करतात तर काही लोक माहिती देऊन इतरांना समृद्ध करता. परंतु हे इंटरनेट माहितीसोबतच मनोरंजनाचे मोठे व्यासपीठ आहे. सोशल मीडियावर (Social Media) सतत मनोरंजक आणि गमतीशीर व्हिडिओ (Funny Viral Video) व्हायरल होत असतात. दररोज मोठ्या प्रमाणात असे व्हिडिओ अपलोड केले जातात. आता पुन्हा एक गमतीशीर व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ एका तरुणीचा असून ती पार्किगमधील दुचाकी (Scooty Girl Viral Video) काढताना दिसत आहे. या तरुणीची गाडी काढण्याची पद्धत पाहून अनेकांनी डोक्यावर हात मारला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…
व्हिडिओमध्ये एक मुलगी पार्किंगमध्ये पार्क केलेली तिची स्कूटी बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र स्कूटी काढतांना तिने जे केले ते पाहून तुम्हीच काय तर कोणीही त्याचं हसू रोखू शकत नाही. या व्हिडीओला नेटिझन्सकडून पसंती मिळत असून आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. यावर अनेक गमतीशीर प्रतिक्रिया देखील येत आहे. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!
मुलीचा कारनामा पाहून येईल हसू
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत ही मुलगी तिची स्कूटी काढण्यासाठी पार्किंगमध्ये पोहोचली आणि खरी गंमत सुरु झाली. स्कूटी मागच्या बाजूने काढायला हवी तर या तरुणीने स्कूटी पुढच्या दिशेला नेण्यास सुरुवात केली. स्कूटी काढतांना तिची चांगलीच तारांबळ उडाली आणि तिने शेजारी उभ्या असलेली वाहने सरकावण्यास सुरुवात केली. तरीही स्कूटी मागे फिरू शकली नाही म्हणून तिने इतर वाहने देखील बाजूला करण्यास सुरुवात केली. बराच वेळ तिचा हा वाहने सरकवण्याचा खेळ सुरु होता आणि यात ती गोंधळलेली दिसत आहे. शेवटी तिने बरीच वाहने मागे सरकवली. यानंतर फ्रेममध्ये जे काही घडलं ते पाहून तुम्ही तुमचं हसू रोखू शकणार नाही. Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल
येथे पाहा तरुणीचा व्हिडिओ
View this post on Instagram
इंस्टाग्रामवर sakhtlogg नावाच्या पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ खूप व्हायरल होत असून आतापर्यंत अनेक लोकांनी व्हिडिओ पाहत आपल्या गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहे.