0.9 C
New York
Thursday, November 30, 2023

Ghatsthapana 2022 Date : कधी आहे घटस्थापना? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व आणि पूजा विधी

Navratri 2022 Date: वर्षभरात चार नवरात्र असतात. 2 नवरात्र गुप्त नवरात्री असतात तर एक चैत्र नवरात्री आणि एक शारदीय नवरात्र (Shardiya Navratri) म्हणून ओळखली जाते. यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 26 सप्टेंबर 2022 ( पासून होत आहे. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होईल आणि नवमी तिथी म्हणजे 05 ऑक्टोबर 2022 पर्यंत साजरी केली (Ghat Sthapna 2022 Shubh Muhurta) जाईल. नवरात्रीच्या काळात भक्त दुर्गा देवीची पूजा करतात आणि पूर्ण भक्तिभावाने उपवास करतात. काही लोक संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात. नवरात्रीत घरोघरी घटस्थापना  केली जाते. जाणून घेऊया नवरात्रीच्या दिवशी घटस्थापनेचा मुहूर्त आणि पूजा विधी.Also Read – Maha Navami 2022 : मंगळवारी महानवमी, जाणून घ्या पूजाविधी आमि 4 मुहूर्तावर करा कन्या पूजन

शारदीय नवरात्री तिथी (Navratri 2022 Date And Timing)

प्रतिपदा तिथी आरंभ – 26 सप्टेंबर 2022, सोमवार, पहाटे 03:23 वाजता
प्रतिपदा तिथी समाप्ती- 27 सप्टेंबर 2022 मंगळवार, पहाटे 03:08 वाजता Also Read – Mumbai News : मुंबईमध्ये गरबा खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!

घटस्थापना शुभ मुहूर्त (Ghatasthapana Muhurta 2022)

घट स्थापना तारीख: 26 सप्टेंबर 2022, सोमवार
घटस्थापना मुहूर्त: 26 सप्टेंबर 2022 सकाळी 06:28 ते 08:01 पर्यंत
एकूण कालावधी 01 तास 33 मिनिटे Also Read – Durga Ashtami 2022: दुर्गा अष्टमीला करा हे काम, दुर्गा देवी होईल प्रसन्न, पूर्ण होतील सर्व मनोकामना

घटस्थापना पूजा विधी (Ghatasthapana 2022 Puja Vidhi)

  • सर्वप्रथम मातीचे भांडे घ्या. त्यात तीन थरांमध्ये माती घाला आणि 9 प्रकारचे धान्य मातीत टाका आणि त्यात थोडे पाणी घाला.
  • आता एक कलश घ्या. त्यावर स्वस्तिक बनवा. मग मौली किंवा कलावा बांधून ठेवा. यानंतर कलश गंगाजल आणि स्वच्छ पाण्याने भरा.
  • त्यात एक पूर्ण सुपारी, फुलं आणि दुर्वा घाला. तसेच अत्तर, पंचरत्न आणि नाणे देखील टाका.
  • कलशाच्या आत आंब्याची पाने लावा. कलशच्या झाकणावर तांदूळ ठेवा.
  • देवीचे स्मरण करताना कलशाचे झाकण लावा. आता एक नारळ घ्या आणि त्यावर कलवा बांधा. कलशवर स्वस्तिक चिन्ह बनवा.
  • कुंकवाने नारळावर टिळक लावा आणि नारळ कलशावर ठेवा.
  • कलशावर नारळासोबत तुम्ही काही फुलेही ठेवू शकता.
  • दुर्गा देवीच्या स्वागतासाठी हा कलश मंदिरात स्थापन करा.

घटस्थापनेचे महत्व (Importance of Ghatsthapana)

हिंदू धर्मातील शारदीय नवरात्रोत्सवात घटस्थापनेला (कलश प्रतिष्ठापन) विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतांनुसार कलश हे देवता, ग्रह आणि नक्षत्रांचे निवासस्थान मानले जाते. कलश हे सुख-समृद्धी आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते. कलशालाच घट देखील म्हटले जाते. नवरात्रीमध्येही कलशाची स्थापना करून सर्व दैवी शक्तींचे आवाहन केले जाते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles