1.2 C
New York
Thursday, November 30, 2023

Girish Mahajan On Ajit Pawar : गिरीश महाजनांनी अजित पवारांना काढला चिमटा! म्हणाले, एका रात्रीत देवेंद्र फडणवीसांसोबत…

Girish Mahajan On Ajit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासारखे कॅमेरे घेऊन आईला भेटायला जात नाही, असे वक्तव्य विरोधीपक्ष नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी बारामतीच्या भाषणात (Baramati) केले होते दरम्यान या वक्तव्यावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (BJP Leader Girish Mahajan) यांनी प्रत्युत्तर देत नरेंद्र मोदी व त्यांची आई व त्यांचा परिवार याबद्दल संपूर्ण देशाला माहिती आहे. मात्र, अजित पवारांच्या मनात काळं बेरा असल्याने आपल्या परिवारातील लोकांना भेटायला त्यांना संभ्रम आहे.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…

अजित पवार यांच्या परिवारातील लोक कुठल्या कुठल्या गोष्टीत अडकले आहेत, हे आपल्या माहिती आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अजित पवारांना सांगण्याची गरज नाही, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!

गिरीश महाजन यांनी जळगावात पत्रकारांशी संवाद साधला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेबाबतही बोलताना गिरीश महाजन यांनी अजित पवारांवर खोचक निशाणा साधला. ते म्हणाले, अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेपेक्षा आपली व आपल्या पक्षाची चिंता करावी. एका रात्रीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री व्हायला अजित पवार तयार झाले होते. मग आताच अजित पवारांना देवेंद्र फडणीसांचं वावगं का? असा सवाल देखील गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे. Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल

हागणदारी मुक्ती योजनेबाबत काय म्हणाले गिरीश महाजन?

दवंडी पीटवून कायदे व सक्ती करून जर लोकांना हागणदारी मुक्तीबाबत समजत नसेल तर अशा लोकांचा फुलांचा गुलदस्ता देवून व हार घालून सत्कार करण्यात येणार आहे. ही भूमिका खुद्द ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली आहे. त्यामुळे आता ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते गावाच्या बाहेर शौचास बसणाऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे.
हागणदारी मुक्त योजनेसाठी ग्रामविकास विभाग कठोर पावले उचलणार असून रस्त्यावर शौचास बसलेले आढळल्यास स्वतः ग्रामविकास मंत्री अशा लोकांचा पुष्पगुच्छ व हार घालून सत्कार करणार आहेत. ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी यांच्या माध्यमातून देखील हागणदारी मुक्तीसाठी प्रभावी उपाययोजना करणार असल्याचेही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?

शिंदे- फडणवीस सरकारने गेल्या शनिवारी पालकमंत्र्यांची घोषणा केली. काही जिल्ह्यांना एकच पालकमंत्री तर काही मंत्र्यांकडे दोन जिल्हे देण्यात आले आहेत. तर एकट्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्हे देण्यात आले आहेत. परंतु त्यांना ते कसं पेलणार, हे मला माहित नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती.

माझ्याकडे पुण्याचं पालकमंत्रिपद होतं. एकच जिल्हा असून देखील मला आठवड्याचा किमान एक दिवस जिल्ह्यासाठी द्यावा लागत होता. अक्षरशः माझ्या नाकी नऊ आले होते. पण आता देवेंद्र फडणवीस हे सहा-सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत, ते त्यांना कसं पेलणार आहे, हे मला माहित नाही, परंतु त्यांना शुभेच्छा, असे देखील अजित पवार यांनी सांगितलं होतं.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles