Highlight India vs South Africa, 1st T20I: पहिल्या टी-20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तिरुअनंतपुरममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात आफ्रिकन संघाने भारतासमोर 107 धावांचे सोपे लक्ष्य ठेवले होते, जे टीम इंडियाने 8 गडी राखून पूर्ण केले. भारताकडून सूर्यकुमार यादव (50*) आणि केएल राहुल (51*) यांनी उत्कृष्ट खेळी खेळली.Also Read – India vs South Africa, 2nd T20I: भारताने आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा मायदेशात जिंकली टी-20 मालिका, रोहित शर्माने रचला इतिहास
तत्पूर्वी रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दीपक चहर आणि अर्शदीप सिंग या जोडीने केलेल्या धारदार गोलंदाजीमुळे आफ्रिकन संघाची अवस्था बिकट झाली. पहिल्या तीन षटकांमध्ये अर्शदीपने तीन आणि दीपकने दोन विकेट्स घेतल्या. अखेर अॅडम मार्क्रम आणि केशव महाराज यांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात दक्षिण आफ्रिकेला 106 धावांपर्यंत मजल मारता आली. भारतासमोर विजयासाठी 107 धावांचे आव्हान होते. Also Read – IND vs SA ODI Series: वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! रोहितऐवजी हा खेळाडू असेल कर्णधार
भारतीय संघात दोन बदल करण्यात आले. हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती देण्यात आली. ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंग यांना संधी देण्यात आली. दीपक चहर आणि रविचंद्रन अश्विन यांनाही संघात संधी देण्यात आली. Also Read – India vs South Africa, 2nd T20I: भारताने 16 धावांनी जिंकला दुसरा सामना, मालिकाही 2-0 ने खिशात
.liveblog-entry{border-top:none !important;}
Live Updates
-
10:31 PM IST
Live India vs South Africa, 1st T20I: पहिल्या टी-20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तिरुअनंतपुरममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात आफ्रिकन संघाने भारतासमोर 107 धावांचे सोपे लक्ष्य ठेवले होते, जे टीम इंडियाने 8 गडी राखून पूर्ण केले. भारताकडून सूर्यकुमार यादव (50*) आणि केएल राहुल (51*) यांनी उत्कृष्ट खेळी खेळली.
-
10:31 PM IST
IND vs SA 1st T20I Live: केएल राहुलने षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. भारताने हा सामना 20 चेंडू राखून जिंकला. मालिकेत 1-0 अशी आघाडी
-
10:30 PM IST
IND vs SA 1st T20I Live: 14 षटकांनंतर भारताने 2 गडी गमावून 80 धावा केल्या. विजयासाठी शेवटच्या 6 षटकात फक्त 27 धावांची गरज आहे. सूर्यकुमार यादव (35*) आणि केएल राहुल (36*) धावा करून क्रीझवर उभे आहेत.
-
10:29 PM IST
IND vs SA 1st T20I Live: Kagiso Rabada ने भारतीय कर्णधार रोहित शर्माची विकेट घेतली. तिसऱ्या षटकात केवळ दोन चेंडूंचा सामना केल्यानंतर हिटमॅन शून्य वैयक्तिक धावसंख्येवर क्विंटन डी कॉकच्या हाती विकेटच्या मागे झेलबाद झाला.
-
8:51 PM IST
Live India vs South Africa, 1st T20I: तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या T20 सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दीपक चहर आणि अर्शदीप सिंग या जोडीने केलेल्या धारदार गोलंदाजीमुळे आफ्रिकन संघाची अवस्था बिकट झाली. पहिल्या तीन षटकांमध्ये अर्शदीपने तीन आणि दीपकने दोन विकेट्स घेतल्या. अखेर अॅडम मार्क्रम आणि केशव महाराज यांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात दक्षिण आफ्रिकेला 106 धावांपर्यंत मजल मारता आली. भारतासमोर विजयासाठी 107 धावांचे आव्हान आहे.
-
8:48 PM IST
Live India vs South Africa, 1st T20I:रविचंद्रन अश्विनने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत फक्त आठ धावा दिल्या. यादरम्यान त्याने एक ओव्हर मेडनही टाकली. मात्र, आज त्याला एकही विकेट घेता आली नाही.
-
8:46 PM IST
Innings Break!#TeamIndia bowlers put on a show here in the 1st T20I as they restrict South Africa to a total of 106/8 on the board.
Scorecard – https://t.co/yQLIMooZxF #INDvSA @mastercardindia pic.twitter.com/v2K9K1iQ0C
— BCCI (@BCCI) September 28, 2022
-
8:46 PM IST
Live India vs South Africa, 1st T20I: अर्शदीप-दीपक-हर्षलची धारदार गोलंजाची, आफ्रिकेचं भारतासमोर 107 धावांच आव्हान
-
8:38 PM IST
1ST T20I. WICKET! 19.1: Keshav Maharaj 41(35) b Harshal Patel, South Africa 101/8 https://t.co/yQLIMo7oG7 #INDvSA @mastercardindia
— BCCI (@BCCI) September 28, 2022
-
8:35 PM IST
Live India vs South Africa, 1st T20I: दक्षिण आफ्रिकेने 12व्या षटकात 50 धावा पूर्ण केल्या. रविचंद्रन अश्विनने नववे षटक मेडन टाकले. हर्षल पटेलने दहाव्या षटकात सहा धावा दिल्या. त्यानंतर अश्विनने 11 षटके टाकली ज्यात त्याने फक्त एक धाव दिली. 12 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेने 6 गड्यांच्या मोबदल्यात 51/6 धावा केल्या.