Himachal Pradesh Accident : हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) कुल्लू येथे भीषण अपघाताची (Kullu Bus Accident) घटना समोर आली आहे. प्रवासी बस दरीमध्ये कोसळून 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कुल्लूच्या झोनल हॉस्पिलमध्ये (Zonal Hospital Himachal Pradesh) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. तर यामधील पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना बंजार येथील हॉस्पिलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले.Also Read – Mumbai Rape and Murder : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून चाकूने केले 48 वार
मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील कुल्लूमधील बंजार खोऱ्यातील घियागी भागात काल रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली. प्रवासी बस थेट दरीत कोसळली. या बसमधून चालकासह 17 जण प्रवास करत होते. अपघातामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिस, होमगार्ड आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. सर्वांवर उपचार सुरु असून यामधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. Also Read – Kolhapur Crime: पतीने केली पत्नीसह दोन मुलांची हत्या, पोलिसातही झाला हजर; कोल्हापूर हादरलं!
HP | 7 people killed & 10 others injured after a tourist vehicle rolled down from a cliff at 8:30pm yesterday on NH-305 in Ghiyagi area of Banjar Valley in Kullu. 5 injured are shifted to Zonal hospital, Kullu & 5 are under treatment at Banjar in a hospital: Gurdev Singh SP Kullu pic.twitter.com/FX7GPxQq7T
— ANI (@ANI) September 26, 2022
Also Read – Pune News : दोरीच्या सहाय्याने पत्नीचा गळा आवळून डोक्यात पाटा घातला, नंतर पतीने घेतला गळफास!
धर्मशाला एसडीएम यांनी सांगितले की, यापूर्वी रविवारी मुसळधार पावसामुळे त्रिंड हिल स्टेशनमध्ये अडकलेल्या एकूण 83 पर्यटकांची सुटका करण्यात आली होती. दुपारी दीडच्या सुमारास प्रशासनाला फोन आला त्यानंतर एसडीआरएफला माहिती देण्यात आली. त्यांनी सांगितले की, सुरुवातीला आम्हाला त्रिंडमध्ये 11 लोक अडकल्याची माहिती मिळाली होती आणि आमचे बचाव पथक संध्याकाळी 5 वाजता तेथे पोहोचले. तर आमच्या टीमने आम्हाला सांगितले की, तिथे एकूण 83 लोकं अडकली होती. या सर्व 83 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून कोणीही जखमी झाले नाही.