21.2 C
New York
Friday, September 22, 2023

IND vs AUS 2nd T20: आज नागपुरात खेळला जाणार भारतविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना, बुमराहच्या पुनरागमनाची शक्यता!

IND vs AUS 2nd T20: भारत (India)आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील दुसरा टी-20 सामना शुक्रवारी (23 सप्टेंबर) नागपुरात (Nagpur) होणार आहे. सीरीजमध्ये टिकून राहण्यासाठी भारतीय संघाला (Team India) हा सामना जिंकणे आवश्यक आहे. संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरु होणार आहे. आता या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी येत आहे. संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) तंदुरुस्त झाला असून तो दुसऱ्या सामन्यात दाखल होण्याची शक्यता आहे. संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) जसप्रीत बुमराहबाबत एक अपडेट दिले आहे.Also Read – India vs South Africa, 2nd T20I: भारताने आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा मायदेशात जिंकली टी-20 मालिका, रोहित शर्माने रचला इतिहास

बुमराहविषयी सूर्य कुमारने काय म्हटले?

सूर्यकुमार यादवने जसप्रीत बुमराहच्या फिटनेस संबंधीत चिंता फेटाळून लावली आहे. तो म्हणाला की ‘काळजी करण्यासारखे काही नाही आणि वेगवान गोलंदाज पाठीच्या दुखापतीतून बरा झाल्यानंतर मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे.’ यावरुन बुमराह आता दुसऱ्या टी-20 सामन्यात पुनरागमन करण्यासाठी सज्ज असल्याचे बोलले जात आहे. बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. दुखापतीतून परतलेल्या या गोलंदाजाला आणखी थोडा वेळ देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला होता. इंग्लंड दौऱ्यानंतर बुमराहने भारतीय संघासाठी एकही सामना खेळलेला नाही. Also Read – IND vs SA ODI Series: वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! रोहितऐवजी हा खेळाडू असेल कर्णधार

AUS विरुद्ध बुमराहचा उत्कृष्ट विक्रम

जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात चेंडूने कमाल करत असतो. अशा वेळी जर तो दुसरा सामना खेळला तर टीम इंडियासाठी ही आनंदाची बातमी असेल. जसप्रीत बुमराह हा ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सामन्यात 11 डावात 15 विकेट घेतल्या आहेत. Also Read – India vs South Africa, 2nd T20I: भारताने 16 धावांनी जिंकला दुसरा सामना, मालिकाही 2-0 ने खिशात

अशी असणार पिच

नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरली आहे. येथे खेळल्या गेलेल्या 12 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी स्कोअर 151 आहे. येथे पहिले फलंदाजी करणाऱ्या संघाचाही फायदा कायम आहे. या 12 सामन्यांमध्ये 9 वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. अशा वेळी नाणेफेक येथे निर्णायक भूमिकेत असू शकते. हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, गुरुवारी येथे जोरदार पाऊस झाला. शुक्रवारीही पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, हवामानामुळे खेळात अडथळा निर्माण होऊ शकतो.

ही आहे संभाव्य प्लेइंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल , विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह हर्षल पटेल

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles