6.1 C
New York
Monday, February 6, 2023

IND vs AUS 3rd T20I :ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज निर्णायक सामना! जाणून घ्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन, खेळपट्टी आणि हवामान अपडेट

IND vs AUS 3rd T20I : हैदराबादमध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia 3rd T20I) मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना (Decisive match) होणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad) हा सामना खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला (India vs Australia 3rd T20I Series) आहे. त्यामुळे आज दोन्ही संघ मालिका विजयाच्या उद्देशाने मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या मालिकेतील दुसरा सामना नागपूरमध्ये झाला होता. पावसामुळे हा सामना केवळ 8-8 षटकांचा खेळवण्यात आला. त्यामुळे आजच्या सामन्यादरम्या हवामानाचा अंदाज (Weather Forecast), खेळपट्टीची (Pitch Report) स्थिती आणि संभाव्य प्लेइंग इलेव्हन (Probable Playing XIs) कोणते असे हे जाणून घेऊया.Also Read – India vs South Africa, 2nd T20I: भारताने आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा मायदेशात जिंकली टी-20 मालिका, रोहित शर्माने रचला इतिहास

या मालिकेत खरोखरच चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय फलंदाजांवर सर्वांचे लक्ष असेल. रोहित शर्मा चांगलाच फॉर्मात आहे, तर विराट कोहलीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध धावा करतोय आहे. दुसरीकडे बुमराहच्या पुनरागमनाने भारतीय गोलंदाजीला देखील धार आली आहे. त्यामुळे हा सामना भारतीय संघ नक्की जिंकेल अशी भारतीय चाहत्यांना अपेक्षा आहे. Also Read – IND vs SA ODI Series: वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! रोहितऐवजी हा खेळाडू असेल कर्णधार

हवामानाचा अंदाज (IND vs AUS 3rd T20I in Hyderabad: Weather Forecast)

सामन्यादरम्यान हैदराबादमध्ये तापमान 24 ते 25 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. आर्द्रता सुमारे 80 टक्के असण्याची अपेक्षा आहे आणि सामन्या दरम्यान दव देखील पडेल अशी अपेक्षा आहे. तसेच सामन्यादरम्यान पावसाच्या सरी देखील कोसळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Also Read – India vs South Africa, 2nd T20I: भारताने 16 धावांनी जिंकला दुसरा सामना, मालिकाही 2-0 ने खिशात

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना कुठे पाहाल? (IND vs AUS 3rd T20I Live Streaming Details)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचे टीव्हीवर थेट प्रसारण (TV Broadcast: Star Sports Network) स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरून होणार आहे. त्यामुळे स्टार स्पोर्टच्या चॅनलवर हा सामना पाहू शकता. याशिवाय तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपवर सामना पाहत असाल तर तुम्ही Hotstar वर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग (Online Live Streaming: Hotstar) पाहू शकता.

खेळपट्टीची स्थिती कशी आहे? (IND vs AUS 3rd T20I Pitch Report)

राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमची खेळपट्टी मंद आहे. त्यामुळे फलंदाजीवर परिणाम होतो, विशेषतः दुसऱ्या डावात जास्त परिणाम होऊ शकतो. हैदराबादमध्ये पहिल्या डावात सरासरी 150 आहे तर दुसऱ्या डावात ती 135 पर्यंत खाली घसरते कारण दुसऱ्या डावात फलंदाजी करणे कठीण होते.

टॉस किती वाजता होईल? (Toss Timing)

या सामन्यात नाणेफेक पुन्हा एकदा मोठी भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. कारण नाणेफेक जिंकणारा कर्णधार आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. या निर्णायक सामन्यात नाणेफेक संध्याकाळी 7:00 वाजता होईल.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन (IND vs AUS Probable Playing XIs)

भारत: केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार.

ऑस्ट्रेलिया : अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), डॅनियल सॅम्स, सीन अ‍ॅबॉट, पॅट कमिन्स, अ‍ॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles