15.9 C
New York
Friday, September 22, 2023

IND vs AUS 3rd T20I: भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 विकेट राखून विजय, विराट-सूर्यकुमार-अक्षर ठरले विजयाचे हीरो

IND vs AUS 3rd T20I: विराट कोहली आणि सूर्यकुमारची शतकी खेळी (Virat Kohli and Suryakumar’s centuries), हार्दिक पांड्याची दमदार मॅच फिनिशिंग (Hardik Pandya) आणि अक्षर पटेलच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने 6 विकेट राखून (India beat Australia by 6 wickets) सामन्यात विजय मिळवला. यासोबत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिकाही 3-1 ने जिंकली (India also won T20I series). ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 187 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 69 धावांची खेळी करत हे आव्हान सोपे केले. सूर्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 5 षटकार खेचले.Also Read – India vs South Africa, 2nd T20I: भारताने आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा मायदेशात जिंकली टी-20 मालिका, रोहित शर्माने रचला इतिहास

सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर दुसऱ्या टोकाला संयमी खेळी करणाऱ्या विराटनेही धावांचा वेग वाढवत आपले अर्धशतक पूर्ण केले. कोहलीनेही 48 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकाराच्या साह्याने 63 धावांची दमदार खेळी केली आणि भारताला विजयाच्या जवळ नेले. शेवटी हार्दिक पांड्याने मॅच फिनिशिंग (Hardik Pandya’s match finishing) खेळी खेळत 16 चेंडूत 25 धावा केल्या. दरम्यान अक्षर पटेलने सर्वाधिक (Akshar Patel’s sharp bowling) तीन विकट घेतल्या. Also Read – IND vs SA ODI Series: वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! रोहितऐवजी हा खेळाडू असेल कर्णधार

Winners Are Grinners! ☺️ ☺️

That moment when #TeamIndia Captain @ImRo45 received the #INDvAUS @mastercardindia T20I series trophy 🏆 from the hands of Mr. @ThakurArunS, Treasurer, BCCI. 👏 👏 pic.twitter.com/nr31xBrRBQ

— BCCI (@BCCI) September 25, 2022

Also Read – India vs South Africa, 2nd T20I: भारताने 16 धावांनी जिंकला दुसरा सामना, मालिकाही 2-0 ने खिशात

तत्पूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने येथे नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कर्णधार फिंच (7) पहिला विकेट म्हणून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र दुसरा सलामीवीर ग्रीनने अवघ्या 19 चेंडूत 50 धावांचा टप्पा पार केला. कॅमरून ग्रीनने धडाकेबाज खेळी खेळत झटपट अर्धशतक झळकावले. मात्र भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर तो आऊट झाला. यानंतर ग्लेन मॅक्सवेल (6) आणि स्टीव्ह स्मिथ (9) पुन्हा एकदा फ्लॉप ठरले.

यानंतर जोश इंग्लिस (24) याने टीम डेव्हिडसह ऑस्ट्रेलियाचा डाव पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. डावाच्या शेवटच्या षटकात डेव्हिड बाद झाला आणि त्याने ऑस्ट्रेलियासाठी पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक केले. याआधी त्याने सिंगापूरसाठी 5 वेळा T20 मध्ये अर्धशतके झळकावली होती. त्याच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 7 विकेट गमावून 186 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात केएल राहुल (1) डॅनियल सॅमचा बळी ठरला. त्यानंतर रोहितने (17) चांगली सुरुवात करून दिली मात्र तोही लवकर बाद झाला. त्यानतंर सुर्यकुमार आणि विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. दोघांनीही 100 धावांची भागीदारी केली. दरम्यान सुर्यकुमार यादव 69 धावा करून बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीनेही त्याचे अर्धशकत पूर्ण केले आणि भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन पोहोचवले. तो अखेरच्या षटकात बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्याने 20व्या षटकाच्या 5 चेंडूवर चौकार खेचून भारताला विजय मिळवून दिला.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles