15.9 C
New York
Friday, September 22, 2023

IND Vs SA 2ND T20: टीम इंडियाकडे आज मालिकाविजयाची संधी, अशी असेल प्लेइंग इलेव्हन

IND Vs SA 2ND T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना (IND Vs SA T20) टीम इंडियाने जिंकला. त्यानंतर आता आज गुवाहाटीतील सामन्यात विजय मिळवून (India Vs South Africa 2nd T20) टीम इंडियाला मालिका काबीज करण्याची संधी आहे. या मालिकेपूर्वी (India vs South Africa T20I Series) टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला असून जसप्रीत बुमराहसारख्या काही महत्त्वाच्या खेळाडूंना वगळल्यानंतरही भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये आणि लयीत दिसत आहे. दुसरा T20 सामना कधी आणि किती वाजता होणार? तुम्ही तो कसा पाहू शकता? हे जाणून घेऊया.Also Read – India vs South Africa, 2nd T20I: भारताने आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा मायदेशात जिंकली टी-20 मालिका, रोहित शर्माने रचला इतिहास

कधी आणि कुठे होणार सामना?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी-20 सामन्यातील दुसरा सामना आज (02 ऑक्टोबर) होणार आहे. हा सामना गुवाहाटी येथील बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल परंतु नाणेफेक अर्धा तास आधी संध्याकाळी 6.30 वाजता होईल. Also Read – IND vs SA ODI Series: वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! रोहितऐवजी हा खेळाडू असेल कर्णधार

वेगवान गोलंदाजी कॉम्बिनेशन?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Ind Vs SA T20) दुसऱ्या T20 सामन्यात सर्व भारतीय चाहत्यांच्या नजरा टीम इंडियाच्या प्लेइंग 11 वर असतील. फलंदाजीतील फारसे बदल होणार नाहीत, मात्र वेगवान गोलंदाजांसाठी कर्णधार रोहित शर्माला आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासमोर खेळाडू निवडण्याचं आव्हान असेल. टीम इंडिया मालिका जिंकण्याच्या उद्देशाने आज मैदानात उतरेल. त्यामुळे विजयी प्लेइंग इलेव्हन असणे खूप गरजेचं आहे. कर्णधार रोहित मोहम्मद सिराजवर विश्वास ठेवतो का? हे देखील पहावं लागेल. Also Read – India vs South Africa, 2nd T20I: भारताने 16 धावांनी जिंकला दुसरा सामना, मालिकाही 2-0 ने खिशात

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, दीपक चहर, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल/रविचंद्रन अश्विन.

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रिले रॉसो/रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, बेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, अॅनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles