1.2 C
New York
Thursday, November 30, 2023

IND vs SA ODI Series: वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! रोहितऐवजी हा खेळाडू असेल कर्णधार

IND vs SA ODI Series: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND v SA) यांच्यात होणार्‍या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा (Team India Announced for ODI series) करण्यात आली आहे. या मालिकेसाठी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी शिखर धवनला (Shikhar Dhawan) कर्णधार बनवण्यात आले आहे. उभय संघांमधील मालिका 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंचा या मालिकेत समावेश करण्यात आलेला नाही. या मालिकेत अनेक युवा खेळाडू खेळताना दिसणार आहेत.Also Read – India vs South Africa, 2nd T20I: भारताने आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा मायदेशात जिंकली टी-20 मालिका, रोहित शर्माने रचला इतिहास

Shikhar Dhawan (C), Shreyas Iyer (VC), Ruturaj Gaikwad, Shubhman Gill, Rajat Patidar, Rahul Tripathi, Ishan Kishan (WK), Sanju Samson (WK), Shahbaz Ahmed, Shardul Thakur, Kuldeep Yadav, Ravi Bishnoi, Mukesh Kumar, Avesh Khan, Mohd. Siraj, Deepak Chahar.#TeamIndia | #INDvSA

— BCCI (@BCCI) October 2, 2022

Also Read – India vs South Africa, 2nd T20I: भारताने 16 धावांनी जिंकला दुसरा सामना, मालिकाही 2-0 ने खिशात

या खेळाडूंना मिळाली संधी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची धुरा शिखर धवनच्या खांद्यावर देण्यात आली आहे. या मालिकेसाठी शिखर धवनकडे कर्णधारपद देण्यात आले आहे तर श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या टी-20 मालिकेत श्रेयस अय्यरही टीम इंडियाचा एक भाग आहे. ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन यांचं वनडे संघात पुनरागमन झाले आहे. हे दोन्ही खेळाडू काही काळ टीम इंडियाचा भाग बनू शकले नाहीत. यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनलाही या संघात स्थान मिळाले आहे. Also Read – IND Vs SA 2ND T20: टीम इंडियाकडे आज मालिकाविजयाची संधी, अशी असेल प्लेइंग इलेव्हन

🚨 NEWS 🚨: India’s squad for ODI series against South Africa announced. #TeamIndia | #INDvSA | @mastercardindia

— BCCI (@BCCI) October 2, 2022

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चहर.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles