2.9 C
New York
Friday, December 8, 2023

Ind vs SA T20I series: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20I मालिकेआधी भारताला मोठा झटका! तीन स्टार खेळाडू संघाबाहेर

Ind vs SA T20I series: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत 2-1 ने विजय मिळवल्यानंतर फॉर्मात असलेल्या टीम इंडियाला (Team India) मोठा झटका बसला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA T2O Series) टी-20 मालिकेआधी संघातील तीन खेळाडू मालिकेतून बाहेर पडले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरोधात भारत 28 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र त्याआधीच टीम इंडियातून दीपक हुड्डा, मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या संघातून बाहेर पडले आहेत.Also Read – India vs South Africa, 2nd T20I: भारताने आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा मायदेशात जिंकली टी-20 मालिका, रोहित शर्माने रचला इतिहास

पीटीआयच्या वृत्तानुसार टीम इंडियाचे 2 स्टार खेळाडू दीपक हुडा (Deepak Hudda) आणि मोहम्मद शमी (Mohameed Shmai) दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडले आहेत, तर बीसीसीआयने (Bcci) हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) विश्रांती दिली आहे. या तीन महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघासाठी मालिकेत अडचणी निर्माण होऊ शकतात. Also Read – IND vs SA ODI Series: वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! रोहितऐवजी हा खेळाडू असेल कर्णधार

शमी अद्याप तंदुरुस्त झालेला नाही. याशिवाय युवा अष्टपैलू दीपक हुड्डा याच्याही कंबरेतील मांसपेशी दुखल्याने तो देखील या आगामी मालिकेतून बाहेर पडला आहे. हुड्डा हा T20 विश्वचषक भारतीय संघाचा भाग आहे, तर मोहम्मद शमीचा या स्पर्धेसाठी राखीव वेगवान गोलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंची अनुपस्थिती भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरू शकते. Also Read – India vs South Africa, 2nd T20I: भारताने 16 धावांनी जिंकला दुसरा सामना, मालिकाही 2-0 ने खिशात

या दोन खेळाडूंची संघात एंट्री

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार शमीच्या जागी वेगवान गोलंदाज उमेश यादव दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या संघाचा भाग असेल, तर हार्दिक पांड्याला कामाच्या ताणामुळे विश्वचषकापूर्वी विश्रांती देण्यात आली आहे आणि त्याच्या जागी बंगालचा अष्टपैलू खेळाडू शाहबाज अहमदचा संघात समावेश करण्यात आला आहे.

श्रेयस अय्यरलाही संघात स्थान

याशिवाय श्रेयस अय्यरलाही (Shreyas Iyer) या संघात स्थान देण्यात आले आहे. अय्यर अलीकडेच दुलीप करंडक स्पर्धेत पश्चिम विभागाचा भाग होता आणि त्यांनी जेतेपद पटकावले आहे. याशिवाय श्रेयसचा टी-20 विश्वचषक संघात राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.

कुठे होणार तीन सामने?

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणार्‍या या 3 सामन्यांच्या मालिकेला 28 सप्टेंबरपासून तिरुअनंतपुरममध्ये सुरुवात होईल, दुसरा सामना 2 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथे खेळला जाईल आणि त्यानंतर तिसरा आणि शेवटचा सामना 4 ऑक्टोबर रोजी इंदूरमध्ये खेळला जाईल.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles