21.2 C
New York
Friday, September 22, 2023

IND W vs ENG W: दिप्ती शर्माच्या ‘मंकडिंग’मुळे इंग्लंडचा संघ गोंधळाला, खेळाडूला मैदानावरच कोसळले रडू

IND W vs ENG W: भारत-इंग्लंड महिला संघांमधील (IND vs ENG) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा अंतिम सामना शनिवारी लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यासह ही मालिका भारताने 3-0 ने जिंकली. मालिकेचा अंतिम सामना हा खूप अटीतटीचा ठरला. हा सामना भारताने 16 धावांनी जिंकला असला तरी सामन्यात भारताने मिळवलेला शेवटचा बळी वादाचे कारण ठरला आहे.
या सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करत 45.4 षटकात सर्वबाद 169 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघाने 43.3 षटकांत 9 गडी गमावून 153 धावा केल्या. या सामन्यात भारतीय गोलंदाज दीप्ती शर्माने 44 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर नॉन-स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या शार्लोट डीनला धावबाद केल्याने इंग्लंड संघाने हा सामना 16 धावांनी गमावला. मात्र दिप्ती शर्माने इंग्लंडची फंलदाज शार्लोट डीनला ज्या पद्धतीने धावबाद केले, त्यावर वाद निर्माण होत अनेक प्रतिक्रिया दिल्या जात आहे.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…

दिप्तीने डीनला असे केले धावबाद

या सामन्यात भारताने विजयासाठी दिलेल्या 170 धावांचे लक्ष्य इंग्लंडच्या संघ प्रयत्न करत असताना त्यांच्या 153 धावा झाल्या होत्या. यावेळी मैदानात शार्लोट डीन आणि फ्रेया डेव्हिस ही जोडी फलंदाजी करत होती. शार्लोट डीनने संयमी खेळी करत इंग्लंड संघाची बाजू सांभाळाली होती. तिने 80 चेंडूंमध्ये 47 धावा केल्या. विजयाच्या जवळ असताना 43 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर भारतीय गोलंदाज दिप्ती शर्माने तिला धावबाद करून इंगलंडच्या स्वप्नावर पाणी फेरले. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!

This is so satisfying, she walked out of line then comeback so that England team cannot make any point #INDvsENG #DeeptiSharmapic.twitter.com/6y97PO2zzL

— shi⁷ 🔮 (@kooclown_) September 24, 2022

दरम्यान, घडलं असं की, दिप्तीने क्रिकेटच्या नियमांचा पुरेपूर फायदा घेत चेंडू फेकण्याआधीच नॉन स्ट्राईकवर असलेल्या शार्लोट डीनने क्रीझ सोडताच तिला धावबाद केले. शार्लोट नियमाविरुद्ध चेंडू टाकण्यापूर्वी धाव घेण्यासाठी दोन-तीन वेळा क्रीजच्या बाहेर गेली होती. ही बाब कर्णधार हरमनप्रीत कौर आणि गोलंदाज दीप्ती शर्माने लक्षात घेतली आणि जेव्हा दीप्ती चौथा चेंडू टाकण्यासाठी पुढे गेली तेव्हा शार्लोट डीनने क्रीझ सोडली होती. याच संधीचा फायदा घेत दीप्तीने चेंडू न टाकता डीनला धावबाद केले. पूर्वी याला मंकडिंग असे म्हटले जात होते, परंतु आता आयसीसीने त्याचा नियमांमध्ये समावेश केला असून  फलंदाज आता चुकीच्या पद्धतीने फायदा घेऊ शकत नाही. Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल

शार्लोट डीनला अश्रू अनावर

दिप्ती शर्माने शार्लोट डीनला अशा प्रकारे धावबाद केल्याने शार्लोट डीनला मैदानावरच रडू कोसळले. यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून काहींनी दिप्ती शर्मावर टीका करत आहे तर काहींनी दिप्तीने क्रिकेटविषयक नियमांचे पालन करूनच हा बळी घेतल्याचे म्हणत दिप्तीला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रित कौरने दिप्तीला पाठिंबा दिला आहे.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles