2.1 C
New York
Wednesday, February 1, 2023

India vs South Africa, 1st T20I: भारताची दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट्सनी मात! मालिकेत 1-0 अशी आघाडी

India vs South Africa, 1st T20I: अर्शदीप सिंग, दीपक चहर आणि हर्षल पटेलची धारदार गोलंदाजी आणि नंतर के एल राहुल (51*) आणि सूर्यकुमार यादव (50*) यांच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव (India beat South Africa by 8 wickets) केला. या विजयासोबतच भारताना तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत (India vs South Africa T20I series) 1-0 ने आघाडी घेतली आहे. तिरुअनंतपुरममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 107 धावांचं माफक लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य भारतीय संघानं 20 चेंडू बाकी (IND vs SA T20I Series) असताना केवळ दोन विकेटच्या मोबदल्यात पार केले.Also Read – India vs South Africa, 2nd T20I: भारताने आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा मायदेशात जिंकली टी-20 मालिका, रोहित शर्माने रचला इतिहास

#TeamIndia finish things off in style! 👌 👌

A SIX from vice-captain @klrahul to bring up his FIFTY as India take a 1-0 lead in the 3-match #INDvSA T20I series. 👏 👏 @mastercardindia | @StarSportsIndia pic.twitter.com/6Fh0APf52F

— BCCI (@BCCI) September 28, 2022

Also Read – IND vs SA ODI Series: वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! रोहितऐवजी हा खेळाडू असेल कर्णधार

तत्पूर्वी या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खूपच खराब झाली. अर्शदीप सिंग आणि दीपक चहर यांच्या धारदार गोलंदाजीसमोर आफ्रिकेचा अर्धा संघ पहिल्या 15 चेंडूत बाद झाला. आफ्रकेने केवळ 9 धावांत आपल्या सुरुवातीच्या 5 विकेट गमावल्या. यातील चार फलंदाजांना तर त्यांचे खाते देखील उघडता आले नाही. त्यानंतर अॅडम मार्करम (25), वयान पार्नेल (24) आणि केशव महाराज (41) यांनी संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. Also Read – India vs South Africa, 2nd T20I: भारताने 16 धावांनी जिंकला दुसरा सामना, मालिकाही 2-0 ने खिशात

.@arshdeepsinghh set the ball rolling for #TeamIndia & bagged the Player of the Match award as India won the first #INDvSA T20I. 👍 👍

Scorecard ▶️ https://t.co/L93S9k4QqD pic.twitter.com/MHdsjIMl0t

— BCCI (@BCCI) September 28, 2022

भारताची धारदार गोलंदाजी

आज आफ्रिकेच्या कोणत्याही खेळाडूकडे अर्शदीप सिंग आणि दीपक चहरच्या स्विंग होणाऱ्या चेंडूंना उत्तर नव्हते. अर्शदीप सिंगने आपल्या एका षटकात 3 बळी घेऊन पाहुण्या संघाचे कंबरडे मोडले. याशिवाय दीपक चहरनेही सुरुवातीच्या दोन षटकात 2 विकेट्स घेतल्या. मधल्या षटकांत हर्षल पटेलनेही आफ्रिकेला 2 धक्के दिले. याशिवाय अक्षर पटेलनेही एक विकेट आपल्या नावावर केली.

5 wickets summed up in 11 seconds. Watch it here 👇👇
Don’t miss the LIVE coverage of the #INDvSA match on @StarSportsIndia pic.twitter.com/jYeogZoqfD

— BCCI (@BCCI) September 28, 2022

भारताची दमदार फलंदाजी

दक्षिण आफ्रिकेसाठी स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने 107 धावांचे लक्ष्य वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याने कर्णधार रोहित शर्माला (0) स्वस्तात बाद करून आपल्या संघाला संधी दिली. मात्र केएल राहुलची संयमी खेळी आणि सूर्यकुमार यादवच्या निर्भय खेळीने आफ्रिकेला सामन्यात पुन्हा पुनरागमन करण्याची संधी निर्माण होऊ दिली नाही. दरम्यान एनरिच नॉर्टजेने विराट कोहलीला (3) बाद करून भारताची धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच षटकात सूर्यकुमार यादवने पहिल्या 3 चेंडूत सलग 2 षटकार ठोकत दक्षिण आफ्रिकेच्या आशांवर पाणी पेरले.

सूर्यकुमार- केएल राहुलची अर्धशतके

अप्रतिम फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमारने 33 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 50 धावा केल्या. तर केएल राहुलनेही या मॅचमध्‍ये कोणत्‍याही दडपणाशिवाय खेळी करत अर्धशतक पूर्ण केले. राहुलने 56 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 51 धावा केल्या. विजयासाठी 3 धावांची गरज असताना राहुलने उतुंग षटकार खेचून आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर या मालिकेतील दुसरा सामना रविवारी गुवाहाटी येथे खेळला जाईल.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles