2.9 C
New York
Friday, December 8, 2023

India vs South Africa, 2nd T20I: भारताने आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा मायदेशात जिंकली टी-20 मालिका, रोहित शर्माने रचला इतिहास

India vs South Africa, 2nd T20: दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव केला. या वियासोबतच टीम इंडियाने पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेला मायदेशात टी-20 मालिकेत पराभूत केले आहे. तसेच तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 3 गड्यांच्या बदल्यात 237 धावां केला. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. दीपक चहरने पहिले षटक मेडन टाकल्यानंतर दुसऱ्या षटकात अर्षदिपने दोन विकेट घेततल्या. मात्र त्यानंतर अॅडम माक्ररम, क्विंटन डी कॉक आणि डेव्हिड मिलर यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 3 गडी गमावून 221 मजल मारली. मिलरने आपले वेगवान शतक पूर्ण केले मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.Also Read – IND vs SA ODI Series: वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! रोहितऐवजी हा खेळाडू असेल कर्णधार

रोहितने रचला इतिहास

या मालिकेत विजयासोबत कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ आतापर्यंत भारतात एकही टी-20 मालिका हारला नव्हता. परंतु रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडियाने या मालिकेत 2-0 ने घाडी घेतली आहे. यासोबत ही तीन सामन्यांची मालिका देखील आपल्या नावावर केली आहे. भारतीय भूमीवर T20I मालिकेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणारा रोहित शर्मा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. Also Read – India vs South Africa, 2nd T20I: भारताने 16 धावांनी जिंकला दुसरा सामना, मालिकाही 2-0 ने खिशात

Appreciation all around for David Miller. 👏👏

But it's #TeamIndia who win the second #INDvSA T20I to take an unassailable lead in the series. 🙌 🙌

Scorecard 👉 https://t.co/58z7VHliro pic.twitter.com/ShKkaF0inW

— BCCI (@BCCI) October 2, 2022

Also Read – IND Vs SA 2ND T20: टीम इंडियाकडे आज मालिकाविजयाची संधी, अशी असेल प्लेइंग इलेव्हन

दक्षिण आफ्रिकेचा डाव

भारताने दिलेल्या 238 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खूपच खराब झाली. कर्णधार टेम्बा बावुमा आणि रेली रोझू यांना दोघांना खातेही उघडता आले नाही. अर्शदीप सिंगच्या पहिल्याच षटकात ते दोघे माघारी परतले. या दोन विकेट गेल्या तेव्हा स्कोअरबोर्डवर फक्त 1 धाव होती. त्यानंतर एडिन मार्करामने 19 चेंडूत 33 धावा करत संघावरील दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अक्षर पटेलच्या चेंडूवर बोल्ड झाला. यानंतर डेव्हिड मिलरने मैदानात येऊन आपला नैसर्गिक खेळ खेळत स्कोअरबोर्ड हलता ठेवला. मात्र दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या क्विंटन डी कॉकला लय पकडायला बराच वेळ लागला. डी कॉक 34 चेंडूत 33 धावा खेळत असताना त्याने वेगवान खेळी सुरु केली आणि अक्षर पटेलच्या षटकात दोन षटकार आणि एक चौकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही फलंदाजांनी आक्रमक खेळी करत आफ्रिकेच्या विजयाच्या आशा जिवंत केल्या, सामना संपण्याआधी मिलरने आपले शतक देखील पूर्ण केले. परंतु संघाला विजय मिळवू देण्यात त्यांना यश आले नाही. 20 षटकात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत 221 धावांपर्यंत मजल मारली.

भारताचा डाव

तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रोहित शर्मा (43) आणि केएल राहुल (57) यांनी भारतासाठी मोठ्या धावसंख्या उभारून डावाचा पाया रचला. दोन्ही खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले तेव्हा भारताची धावसंख्या 11.3 षटकात 107 धावांवर होती. येथून विराट कोहली (49*) आणि सूर्यकुमार यादव (61) यांनी धडाकेबाज फलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाजांची दाणादाण उडवली. आफ्रिकेचे सर्व गोलंदाज भारतीय फलंदाजांसमोर हतबल दिसले. सूर्यकुमार यादव धावबाद झाल्यानंतर दिनेश कार्तिकने शेवटच्या 7 चेंडूत 17 धावा करून भारताची धावसंख्या 237 पर्यंत पोहोचवली.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles