25 C
New York
Tuesday, June 6, 2023

India vs South Africa, 2nd T20I: भारताने 16 धावांनी जिंकला दुसरा सामना, मालिकाही 2-0 ने खिशात

India vs South Africa, 2nd T20I: भारताने दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने पाहुण्या संघाला 238 धावांचे मोठे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघाने 221 धावांपर्यंत मजल मारता आली. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खूपच खराब झाली. कर्णधार टेम्बा बावुमा आणि रेली रोझू यांना दोघांना खातेही उघडता आले नाही. अर्शदीप सिंगच्या पहिल्याच षटकात ते दोघे माघारी परतले. या दोन विकेट गेल्या तेव्हा स्कोअरबोर्डवर फक्त 1 धाव होती.Also Read – India vs South Africa, 2nd T20I: भारताने आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा मायदेशात जिंकली टी-20 मालिका, रोहित शर्माने रचला इतिहास

त्यानंतर एडिन मार्करामने 19 चेंडूत 33 धावा करत संघावरील दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अक्षर पटेलच्या चेंडूवर बोल्ड झाला. यानंतर डेव्हिड मिलरने मैदानात येऊन आपला नैसर्गिक खेळ खेळत स्कोअरबोर्ड हलता ठेवला. मात्र दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या क्विंटन डी कॉकला लय पकडायला बराच वेळ लागला. डी कॉक 34 चेंडूत 33 धावा खेळत असताना त्याने वेगवान खेळी सुरु केली आणि अक्षर पटेलच्या षटकात दोन षटकार आणि एक चौकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही फलंदाजांनी आक्रमक खेळी करत आफ्रिकेच्या विजयाच्या आशा जिवंत केल्या, परंतु संघाला विजय मिळवू देण्यात त्यांना यश आले नाही. Also Read – IND vs SA ODI Series: वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! रोहितऐवजी हा खेळाडू असेल कर्णधार

Also Read – IND Vs SA 2ND T20: टीम इंडियाकडे आज मालिकाविजयाची संधी, अशी असेल प्लेइंग इलेव्हन.liveblog-entry{border-top:none !important;}

Live Updates



  • 11:32 PM IST


    India vs South Africa, 2nd T20I, LIVE:सामना संपण्याआधी मिलरने आपले शतक देखील पूर्ण केले. 20 षटकात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत 221 धावांपर्यंत मजल मारली. परंतु भारताने हा सामना 16 धावांनी जिंकला. या विजयासोबतच भारताने तीन टी-20 सामन्यांची मालिका 2-0ने खिशात घातली आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी (4 ऑक्टोबर) इंदूरमध्ये होणार आहे.



  • 11:32 PM IST


    India vs South Africa, 2nd T20I, LIVE: डी कॉक 34 चेंडूत 33 धावा खेळत असताना त्याने वेगवान खेळी सुरु केली आणि अक्षर पटेलच्या षटकात दोन षटकार आणि एक चौकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही फलंदाजांनी आक्रमक खेळी करत आफ्रिकेच्या विजयाच्या आशा जिवंत केल्या, परंतु संघाला विजय मिळवू देण्यात त्यांना यश आले नाही.



  • 11:31 PM IST


    India vs South Africa, 2nd T20I, LIVE: एडिन मार्करामने 19 चेंडूत 33 धावा करत संघावरील दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अक्षर पटेलच्या चेंडूवर बोल्ड झाला. यानंतर डेव्हिड मिलरने मैदानात येऊन आपला नैसर्गिक खेळ खेळत स्कोअरबोर्ड हलता ठेवला. मात्र दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या क्विंटन डी कॉकला लय पकडायला बराच वेळ लागला.



  • 11:31 PM IST


    India vs South Africa, 2nd T20I, LIVE: लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खूपच खराब झाली. कर्णधार टेम्बा बावुमा आणि रेली रोझू यांना दोघांना खातेही उघडता आले नाही. अर्शदीप सिंगच्या पहिल्याच षटकात ते दोघे माघारी परतले. या दोन विकेट गेल्या तेव्हा स्कोअरबोर्डवर फक्त 1 धाव होती.



  • 8:55 PM IST


    India record their fourth-highest T20I total 👏🏻#INDvSA | Scorecard: https://t.co/jYtuRUcl0f pic.twitter.com/XhqNmhNgOy

    — ICC (@ICC) October 2, 2022



  • 8:55 PM IST


    IND vs SA 2रा T20I Live: सूर्यकुमार यादव, विराट कोहली, आणि केएल राहुलच्या फलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांची दाणादाण, विजयासाठी 238 धावांचे अवघड लक्ष्य



  • 8:54 PM IST


    IND vs SA 2रा T20I Live: भारताचा डाव संपला, शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकने 18 धावा केल्या. भारताच्या 20 षटकात 3 बाद 237 धावा.



  • 8:38 PM IST


    India vs South Africa, 2nd T20I, LIVE: 19 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार यादव बाद, 22 चेंडूट ठोकल्या 61 धावा..



  • 8:35 PM IST


    India vs South Africa, 2nd T20I, LIVE: विराट कोहलीने षटकार खेचून पूर्णकेल्या T20 फॉरमॅटधील 11000 धावा, विराटच्या आतापर्यंत 23 चेंडूत 40 धावा.



  • 8:34 PM IST


    India vs South Africa, 2nd T20I, LIVE: सूर्यकुमार यादवचे दमदार अर्धशतक, 18 चेंडूत ठोकल्या 54 धावा, खेळीत 5 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश. भारताचा स्कोअर 2 बाद 178 वर


Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles