INDW VS SLW : महिला टी-20 आशिया कपमध्ये भारतीय महिला संघाने विजयी सलामी दिली आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 151 धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र श्रीलंकेचा संघ केवळ 109 धावांपर्यंत मजल मारू शकला. 53 चेंडूत 76 धावांची धडाकेबाज खेळी खेळणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जला (Jemimah Rodrigues) प्लेयर ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.Also Read – Asia Cup 2022 चे जेतेपद पटकावल्यानंतर टीम श्रीलंकेवर पैशांचा पाऊस, जिंकले इतके कोटी रुपये!
तत्पूर्वी श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली. शेफाली वर्माचा खराब फॉर्म कायम राहिला आणि तिला फक्त 10 धावा करता आल्या. त्यानंतर स्मृती मानधनानेही (06 धावा) निराशा केली. मात्र सुरुवातीच्या दोन विकेट्सनंतर जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांनी भारतीय डावाला वेग मिळवून दिला आणि 92 धावांची भागीदारी केली. हरमनप्रीत कौर 30 चेंडूत 33 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. Also Read – Yuzvendra Chahal ला मागे टाकत Bhuvneshwar Kumar ठरला सर्वात यशस्वी T20 गोलंदाज!
India Women🇮🇳 beat Sri Lanka Women🇱🇰 by 41 runs at Sylhet Outer Cricket Stadium.
Final Score:
INDW 150/6 (20)
SLW 109 (18.2)#INDvSL | #AsiaCup | #WomensAsiaCup2022 | pic.twitter.com/wh5u7OCwqk— All India Radio News (@airnewsalerts) October 1, 2022
Also Read – Pakistan vs Sri Lanka: स्वतः कॅप्टन बनवून पाकिस्तानी प्लेयरने घेतला DRS, भडकला बाबर आझम!
रिचा घोष (09 धावा) आणि पूजा वस्त्राकर (01 धावा) यांनाही चांगली खेळी खेळण्यात निराशा आली. मात्र जेमिमा रॉड्रिग्जने दुसऱ्या टोकाकडून दमदार खेळी करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. जेमिमा 53 चेंडूत 76 धावांची खेळी केल्यानंतर बाद झाली. आपल्या खेळीत रॉड्रिग्जने 11 चौकार आणि 1 षटकार लगावले. त्यानंतर हेमलता (10) आणि दीप्ती शर्मा (01) धावांवर नाबाद राहिली. भारतीय संघाने 20 षटकांत 6 बाद 150 धावा केल्या. श्रीलंकेकडून ओशादी रणसिंघेने तीन बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून हसिनी परेरा (30 धावा) आणि हर्षिता मडावी (22 धावा) वगळता कोणालाही मोठी खेळी करत आली नाही. ओशाडी रणसिंगने 11 धावांचे योगदान दिले. याशिवाय श्रीलंकेच्या केवळ तीन फलंदाजांना दहाव्या आकड्याला स्पर्श करता आला. श्रीलंकेचा संघ 18.2 षटकांत 109 धावांत सर्वबाद झाला. भारताकडून हेमलताने 2.2 षटकात 15 धावा देत सर्वाधिक तीन बळी घेतले. दीप्ती शर्माने चार षटकांत 15 धावा देत 2 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पूजा वस्त्राकरलाही दोन विकेट मिळाल्या, तर राधा यादवने एक विकेट घेतली.