15.9 C
New York
Friday, September 22, 2023

Jalna Crime: लेकीचं अपहरण झालंय म्हणत बापाने रचला बनाव, सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले!

Jalna Crime: जालन्यातील (Jalna News) एका दीड वर्षीय चिमुरडीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. चंदनझिरा पोलिस स्टेशनमध्ये (Jalna Police) तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु झाला. मुलीचे अपहरण झाल्याने गावातील इतर मुलांचे पालकही चिंतेत होते. अपहरण करणारी टोळी फिरत असल्याच्या अफवा पसरु लागल्या. मात्र हा स्वतः बापानेच रचलेला बनाव असल्याचे उघड झाल्याने पोलिसही चक्रावले आहे. बापाने बायकोसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून दीड वर्षांच्या चिमुरडीला (Father killed Daughter jalna) चक्क शेततळ्यात फेकून दिल्याची समजताच सर्वांनाच धक्का बसला.Also Read – Aamna Sharif Photos: आमना शरीफचा असा लूक तुम्ही कधी पाहिला नसेल, शॉर्ट्स आणि ब्रालेटमध्ये दिसतेय हॉट!

नेमके काय घडले?

नवरा बायकोमध्ये भांडणे होणे ही सामान्य बाब आहे. ही भांडणे जर जास्त वाढली तर याचा परिणाम त्यांच्या मुलांना भोगावा लागतो. अनेकदा आई-वडील भांडणाचा राग आपल्या मुलांवर काढत असल्याचे दिसते. मात्र जालन्यातील बापाचा राग पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या बापाने रागातून चक्क आपल्या दीड वर्षांच्या निष्पाप लेकीलाच शेततळ्यात फेकून दिले. Also Read – Walnuts Benefits: रोज खावेत 2 भिजवलेले अक्रोड, डायबिटीजसह हृदयाच्या समस्या होऊ शकतात दूर!

पोलिसांनी केला तपास

दीड वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाची तक्रार पोलिसांकडे आली होती. या तक्रारीनंतर पोलिस प्रशासन सतर्क झाले. सध्या अपहरणाची टोळी सक्रिय असल्याच्या अफवा पसरत आहे. यामुळे पोलिसांनी कसून तपास सुरु केला. मात्र यामध्ये काही तरी वेगळेच समोर आले. या मुलीचे अपहरण करणारा दुसरे तिसरे कुणी नसून स्वतः बापच होता. त्यानेच पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर झोपलेल्या चिमुकल्या लेकीला शेततळ्यात फेकून देत तिची हत्या केली. जगन्नाथ डकले असे या आरोपी बापाचे नाव आहे. Also Read – Firing in Mumbai: कांदिवलीत गोळीबार! दोन तरूणांनी दुचाकीवरुन येत केली फायरिंग; एकाचा मृत्यू

स्वतः दिली कबुली

हत्या झालेल्या चिमुरडीचे नाव श्रावणी डकले असे आहे. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर या बापाने आपला गुन्हा कबूल केला. बत्नीसोबत भांडण झाल्याचा राग आला आणि मुलीला शेतकळ्यात फेकल्याचे त्याने सांगितले आहे. या निर्दयी बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलिस स्टेशनमद्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कुटुंबियांना देखील मोठा धक्का बसला आहे.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles