15.9 C
New York
Friday, September 22, 2023

Job Search 2022 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 330 जागांसाठी भरती, इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्यांनी करा अर्ज!

Job Search 2022 : नोकरीच्या शोधात (Job Search 2022) असलेल्या आणि इंजिनिअरिंगची पदवी (Degree in Engineering) घेतलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. या तरुणांना महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहेत. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने (Maharashtra State Power Generation Company) 330 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी www.mahagenco.in या वेबसाईला भेट देऊन करिअर पर्याय निवडून Advt. No. 09/2022 या लिंकमधली जाहिरात वाचावी.Also Read – FCI Recruitment 2022 : भारतीय खाद्य निगममध्ये 5043 पदांसाठी बंपर भरती, जाणून घ्या अधिक माहिती!

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने जारी केलल्या भरती प्रक्रियेअंतर्गत, कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता ही पदं भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून 11 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या तारखेपूर्वीच अर्ज करावा. महाराष्ट्रभर ही भरती होणार आहे. Also Read – SAIL Recruitment 2022 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 333 विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या सविस्तर माहिती!

महत्वाच्या तारखा –

अर्ज करण्याची प्रक्रिया सध्य सुरु आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 11 ऑक्टोबर 2022 Also Read – India Post Recruitment 2022 : आठवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सूवर्ण संधी, आजच करा अर्ज  

पदांचा तपशील –

– एकूण पदं – 330 पदं

– कार्यकारी अभियंता – 73 पदं

– अतिरिक्त कार्यकारी अभियंता – 154 पदं

– उपकार्यकारी अभियंता – 103 पदं

शैक्षणिक पात्रता –

– कार्यकारी अभियंता – इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे. 9 वर्षांचा अनुभव असावा.

– अतिरिक्त कार्यकारी अभियंता – इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे. त्यासोबत 7 वर्षांचा अनुभव असावा.

– उपकार्यकारी अभियंता – इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे. त्यासोबत 3 वर्षांचा अनुभव असावा

वयोमर्यादा –

या सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 40 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles