5 C
New York
Friday, February 23, 2024

Kanpur accident: कानपूरमध्ये ट्रॅक्टरची ट्रॉली पलटून भीषण अपघात, 25 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू

Kanpur accident: उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात झालेल्या एका रस्ते अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. उन्नावच्या चंद्रिका देवी मंदिरातून परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटल्याने हा अपघात झाला. यात भीषण अपघातात 25 भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 28 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. साद परिसरात हा अपघात झाल्याची माहिती आहे.

कानपूरच्या घाटमपूरमध्ये हा अपघात झाला. या ट्रॅक्टर ट्रॉलीमधील भाविक उन्नाव येथून परत देवीचे दर्शन घेऊन परतत होते. घाटमपूर येथील तलावाजवळील रस्त्यावरून जात असताना ट्रॅक्टर ट्रॉली अचानक अनियंत्रित झाली आणि तलावात कोसळली. या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसलेले प्रवाशीही तलावात कोसळले. या घटनेत आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे, तर जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

जनपद कानपुर में हुई सड़क दुर्घटना अत्यंत हृदय विदारक है।

जिलाधिकारी एवं अन्य वरिष्ठ अधिकारियों को तत्काल मौके पर पहुंचकर युद्ध स्तर पर राहत व बचाव कार्य संचालित करने तथा घायलों के समुचित उपचार की व्यवस्था करने के निर्देश दिए गए हैं।

घायलों के शीघ्र स्वास्थ्य लाभ की कामना है।

— Yogi Adityanath (@myogiadityanath) October 1, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघातातील मृतांबाबत संवेदना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, ‘कानपूरमधील दुर्घटनेने दुःखी झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्वांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींसाठी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे’.

Distressed by the tractor-trolley mishap in Kanpur. My thoughts are with all those who have lost their near and dear ones. Prayers with the injured. The local administration is providing all possible assistance to the affected: PM @narendramodi

— PMO India (@PMOIndia) October 1, 2022

दरम्यान प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles