21.7 C
New York
Saturday, June 3, 2023

Lal Bahadur Shastri Jayanti : कुशल नेतृत्व असलेले गांधीवादी नेते होते लाल बहादूर शास्त्री, जाणून घ्या त्यांच्याबाबत या खास गोष्टी

Lal Bahadur Shastri Jayanti : भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज 116 वी जयंती साजरी (Lal Bahadur Shastri Jayanti 2022) केली जात आहे. अतिशय साधी जीवनशैली असलेले शास्त्रीजी हे कार्यक्षम नेतृत्व असलेले गांधीवादी नेते (Lal Bahadur Shastri was skillful leadership) होते. विशेष म्हणजे आज महात्मा गांधी जयंतीसोबतच लाल बहादूर शास्त्री यांचीही जयंती साजरी केली (Facts About Lal Bahadur Shastri) जात आहे. या दोन्ही महान नेत्यांची जन्मतारीख एकाच दिवशी आहे. शास्त्रीजी हे शांत मनाचे व्यक्तिमत्वही होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे झाला होता. ते घरात सर्वात लहान होते त्यामुळे त्यांना प्रेमाने नन्हे म्हटले जात. त्यांच्या आईचे नाव राम दुलारी आणि वडिलांचे नाव मुन्शी प्रसाद श्रीवास्तव होते. शास्त्री यांच्या पत्नीचे नाव ललिता देवी होते. शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांच्याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी.

  • लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यामुळे शास्त्रीजी लहानपणी आईसोबत मिर्झापूरला आजोबांच्या घरी गेले. येथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. कठीण परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. असे सांगितले जाते की, तो दररोज नदीत पोहून शाळेत जात असे. कारण तेव्हा फार कमी गावात शाळा होत्या.
  • लाल बहादूर शास्त्री जेव्हा संस्कृत शिकून काशी विद्यापीठातून बाहेर पडले तेव्हा त्यांना शास्त्री ही पदवी देण्यात आली. यानंतर त्यांनी आपल्या नावापुढे शास्त्री लावायला सुरुवात केली. वयाच्या 16 व्या वर्षी आपले शिक्षण सोडून ते महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत सामील झाले. लाल बहादूर शास्त्री यांचा विवाह ललिता शास्त्री यांच्याशी 1928 मध्ये झाला. त्यांना दोन मुली आणि चार मुलं होती.
  • देशाच्या इतर नेत्यांप्रमाणेच शास्त्रीजींनाही देशाला स्वातंत्र करण्याची तळमळ होती, त्यामुळे त्यांनी 1920 मध्येच स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. 1921 च्या गांधीजींच्या भारत छोडो आंदोलनापासून ते 1942 च्या असहकार चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. यादरम्यान त्यांना अनेकवेळा अटकही झाली आणि पोलिसांच्या कारवाईचा ते बळी ठरले.
  • शास्त्रीजी पंतप्रधान झाल्यानंतर 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले, त्यावेळी त्यांनी देशाला कठीण परिस्थितीतून सावरले. सैनिक आणि शेतकऱ्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी ‘जय जवान जय किसान’चा नाराही दिला.
  • स्वातंत्र्यानंतर ते 1951 मध्ये नवी दिल्लीला गेले आणि त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अनेक खात्यांचा कार्यभार स्वीकारला. नेहरूंच्या आजारपणात ते रेल्वे मंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, गृहमंत्री मंत्री होते.
  • 1964 मध्ये लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. त्यांच्या कारकिर्दीत 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले. पाकिस्तानसोबतच्या युद्धादरम्यान देशात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती. देश उपासमारीच्या समस्येतून जात होता. त्या संकटकाळात लाल बहादूर शास्त्रींनी आपली पगार घेणे बंद केले. लाल बहादूर शास्त्री यांनी देशातील जनतेला आठवड्यातून एकदा उपवास करण्याचे आवाहन केले होते.
  • त्यांनी 11 जानेवारी 1966 रोजी ताश्कंदमध्ये अखेरचा श्वास घेतला. 10 जानेवारी 1966 रोजी ताश्कंद येथे पाकिस्तानशी शांतता करार झाल्यानंतर अवघ्या 12 तासांनी लाल बहादूर शास्त्री यांचे अचानक निधन झाले, काही लोक अजूनही त्याच्या मृत्यकडे एक रहस्य म्हणून पाहतात.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles