21.7 C
New York
Saturday, June 3, 2023

Lata Mangeshkar Birth Anniversary: भावाच्या मित्रावर होते लतादीदींचे प्रेम, या कारणामुळे राहिल्या आयुष्यभर अविवाहित

Lata Mangeshkar Birth Anniversary : स्वर कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी जयंती (Birth Anniversary) आहे. या वर्षीच लतादीदींनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. लतादीदींनी आयुष्यात प्रत्येक नात्याला महत्त्व दिले होते. त्यांचे कुटुंबावर आणि आई-वडिलांवर निस्मिम प्रेम होतं. एवढेच नाही तर त्यांनी आई-वडिलांनाही देवाचा दर्जा देत त्यांची सेवा केली होती.  मात्र, फारच कमी लोकांना माहित असेल की, कुटुंबाव्यतिरिक्त एक व्यक्ती होती जिच्यावर लतादीदींच खूप प्रेम (Lata Mangeshkar Love story) होतं.  जयंतीनिमित्त जाणून घेऊया लतादीदींच्या लव्हस्टोरीबाबत..Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…

डुंगरपूरच्या महाराजांवर होते प्रेम

भारतरत्न असलेल्या लतादीदी ह्या आयुष्यभर अविवाहित राहिल्या. मात्र त्यांनी लग्न का केले नाही. त्यामागेच कारण काय असा प्रश्न चाहत्यांना पडणे स्वाभाविक आहे. लतादीदी देखील इतर मुलींप्रमाणे लग्न करून संसार करण्याचे स्वप्न बाळगून होत्या. मात्र नियतीला कदाचित ते मान्य नव्हते. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!

रिपोर्टनुसार, लतादीदी ह्या डुंगरपूर राजघराण्याचे महाराज राजसिंग यांच्या प्रेमात होत्या. महाराज राजसिंह आणि लतादीदींचे एकमेकांवर खूप प्रेम होते. महाराज राजसिंह हे लतादीदींचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांचे मित्र होते. क्रिकेटने दोघांना जवळ आणले होते. राजसिंह मुंबईत कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आले तेव्हा त्यांची भेट हृदयनाथ यांच्याशी झाली आणि मैत्री घट्ट झाली. त्यावेळी लतादीदींचे नावही प्रसिद्ध व्यक्तींमध्ये गणले जाऊ लागले होते. दरम्यान, लता दीदी आणि राजसिंह यांच्या नात्याची चर्चा मीडियामध्ये सुरू झाली. मात्र, दोघानांही आपलं हे प्रेम गाठता आले नाही. कारण राजसिंह हे राज घराण्यातील होते आणि कोणत्याही सामान्य घरातील मुलीला आपल्या घरातील सून बनवणार नाही, असे वचन त्यांनी आपल्या पालकांना दिले होते. आपल्या पालकांना दिलेले हे वाचन त्यांनी शेवटपर्यंत पाळले. Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल

दोघेही राहिले अविवाहित

लतादीदी आणि महाराज राजसिंह यांचे एकमेकांवर निस्सिम प्रेम होते. मात्र, पालकांना दिलेले वाचन आणि राजघराण्याचे नियमांमुळे राज सिंह या नात्याला न्याय देऊ शकले नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की, त्यानी लतादीदींप्रमाणे मरेपर्यंत अविवाहित रहाणे पसंत केले. मात्र दुसऱ्या कोणाशी लग्न केले नाही. महाराजा राज सिंह हे लतादीदींपेक्षा 6 वर्षांनी मोठे होते. 12 सप्टेंबर 2009 रोजी राज सिंह यांनी जगाचा निरोप घेतला. तर लतादीदींनी या वर्षी शेवटचा श्वास घेतला.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles