21.2 C
New York
Friday, September 22, 2023

Maha Navami 2022 : मंगळवारी महानवमी, जाणून घ्या पूजाविधी आमि 4 मुहूर्तावर करा कन्या पूजन

Maha Navami 2022, Kanya Pujan Muhurat : शारदीय नवरात्रोत्सवाचा उद्या, म्हणजेच 4 ऑक्टोबर 2022, मंगळवारी नवमी आहे. हिंदू पंचांगनुसार, आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या नवमीला महानवमी संबोधले जाते. महानवमीच्या दिवशी माता दुर्गाचं नवम रूप सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. शास्त्रानुसार, मात सिद्धिदात्रीची पूजा केल्याने भय, रोग आणि दुःखाचं निवारण होते. महानवमीला कन्या पूजन देखील केलं जातं. जाणून घ्या किती वाजेपर्यंत असेल महानवमी आणि कन्या पूजनाचे मुहूर्त…Also Read – Mumbai News : मुंबईमध्ये गरबा खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!

आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात महानवमीला 3 ऑक्टोबर सोमवारी दुपारी 04 वाजून 37 मिनिलां प्रारंभ झाला आहे. 4 ऑक्टोबर, मंगळवारी दुपारी 02 वाजून 20 मिनिटांला नवमी समाप्त होऊन दशमी सुरू होईल. Also Read – Durga Ashtami 2022: दुर्गा अष्टमीला करा हे काम, दुर्गा देवी होईल प्रसन्न, पूर्ण होतील सर्व मनोकामना

महानवमीला जुळून आला शुभ योग –

महानवमीला रवी आणि सुकर्मा योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. रवि योग 4 ऑक्टोबरला पूर्ण दिवस राहील. तर सुकर्मा योगाला 4 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजून 23 मिनिटांला प्रारंभ होईल. Also Read – Navratri 2022: कधी आहे अष्टमी आणि नवमी, या दिवशी का करतात कन्या पूजन घ्या जाणून!

या 4 मुहूर्तावर करा कन्या पूजन-

– राहुकाळ- दुपारी 03 वाजून 07 मिनिटं ते 04 वाजून 35 मिनिटं.
– यमगण्ड- सकाळी 09 वाजून 13 मिनिटं ते 10 वाजून 41 मिनिटं.
– गुलिक काळ- दुपारी 12 वाजून 10 मिनिटं ते 01 वाजून 38 मिनिटं.
– दुर्मुहूर्त- रात्री 08 वाजून 37 मिनिटं ते 09 वाजून 24 मिनिटं.

कन्या पूजनाचा विधी-

– महानवमीला कन्या पूजनाला महत्त्व आहे. कन्या पूजनासाठी नऊ कन्या आणि एक मुलाची आवश्यकता असते. नऊ कन्यांची दुर्गा देवीची नऊ रुप तर मुलाची भैरव म्हणून पूजा केली जाते.

– तुम्हाला नऊ कन्या मिळाल्या नाही तर तुम्हाला जितक्या मिळाल्या तितक्या कन्यांचं पूजन करू शकता. उर्वरित कन्यांचं भोजण गायीला द्यावे.

– सगळ्यात आधी कन्या आणि मुलाचे पाय धुवून त्यांना पाटावर बसवावे.

– सर्व कन्या आणि मुलाची पूजा करावी. आरती करावी.

– कन्यांना अन्नदान करावे. कन्या पूजा करण्याच्या आधी मंदिरात देवीला नैवेद्य द्यावा.

– कन्या भोजन झाल्यानंतर त्यांना प्रसादात फळ द्यावे. आपल्या सामर्थ्यानुसार त्यांना दक्षिणा अवश्य द्यावी.

– कन्या आणि मुलाचा चरण स्पर्श करावा.

– कन्यांना आदरपूर्वक निरोप द्यावा. कन्यांच्या रुपाने घरी माता दुर्गा येत असते, असं समजलं जातं.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles