Maharashtra Breaking : नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तश्रृंगी गडावर (Vani Saptshrungi Gad) बोकड बळी बंदी (Bokad Bali) उठवण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) गुरुवारी हा निर्णय दिला आहे. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. हायकोर्टाने सप्तश्रृंगी गडावर बोकड बळीची प्रथेला अटीशर्तीसह परवानगी दिली आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर तब्बल पाच वर्षांनी बंद पडलेली बोकड बळीची प्रथा यंदाच्या नवरात्रौत्सवापासून पुन्हा सुरू होणार आहे.Also Read – Maha Navami 2022 : मंगळवारी महानवमी, जाणून घ्या पूजाविधी आमि 4 मुहूर्तावर करा कन्या पूजन
कधीपासून बंद होती बोकड बळीची प्रथा…
सन 2017 पासून सप्तश्रृंगी गडावरील बोकड बळीची प्रथा बंद करण्यात आली होती. दरम्यान, 11 सप्टेंबर 2016 रोजी दसरा होता. यादिवशी परंपरेनूसार गडावर बोकडाचा बळी दिला जात होता. न्यासाच्या वतीने मानवंदना देताना झाडण्यात आलेल्या बंदुकीतून उडलेल्या छऱ्यामुळे 12 भाविक जखमी झाले होते. त्यामुळे भविष्यात बोकड बळीच्या प्रथेमुळे अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सप्टेंबर 2017 पासून गडावर बोकड बळीची प्रथा बंद करण्यात आली होती. मात्र, या निर्णयाविरुद्ध आदिवासी विकास सोसायटीने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. बोकड बळीची प्रथा बंद केल्या विरुद्ध आदिवासी विकास सोसायटीने जनहित याचिका दाखल केली होती. आता हायकोर्टाने तब्बल पाच वर्षांनी आदिवासी सोसायटीच्या बाजूने निकाल दिला आहे. Also Read – Mumbai News : मुंबईमध्ये गरबा खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
नेमकी काय आहे बोकड बळीची प्रथा…
आदिवासी समाजात सप्तशृंगी देवीचं स्थान महत्त्वाचं आहे. कोणतेही धार्मिक कार्य करताना बोकड बळी देण्याची आदिवासी समाजात प्राचीन परंपरा आहे. तसेच दसऱ्याला देखील नवस पूर्ण करण्यासाठी गडावर बोकड बळी दिला जातो. नवरात्रौत्सवाला दसऱ्याला सांगता होते. त्यानिमित्ताने सप्तशृंगी गडावर नवस पूर्ण करण्यासाठी बोकड बळी देण्याची प्राचीन प्रथा आहे. नवस पूर्ण करण्यासाठी आणलेल्या बोकड्याची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. गडावरील दीपमाळा परिसरात दसरा टप्प्यावर बळी देण्यासाठी आणलेल्या बोकडाची पूजा केली जाते. त्यानंतर न्यासाच्यावतीने मानवंदना देण्यासाठी हवेत गोळीबार केला जातो. त्यानंतर बोकड बळी दिला जातो. यावेळी भाविक मोठी गर्दी करत असतात. Also Read – Durga Ashtami 2022: दुर्गा अष्टमीला करा हे काम, दुर्गा देवी होईल प्रसन्न, पूर्ण होतील सर्व मनोकामना