Maharashtra Breaking : शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. संजय राऊत यांचा आर्थर रोड तुरुंगातील (Arthur Road Jail Mumbai) मुक्काम आणखी वाढला आहे. कोर्टाने संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 10 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना यंदाचा दसरा तुरुंगातच साजरा करावा लागणार, असं दिसत आहे.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) संजय राऊत यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र (Supplementary Charge Sheet) दाखल केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं समजतं. ईडीने कोर्टात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. Also Read – Mumbai Local Mega Block: आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा!
गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला आहे. आज राऊत यांना पुन्हा PMLA न्यायालयात हजर केले असता संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर जोरदार सुनावणी झाली. यावेळी 10 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुढे ढकललेली आहे. Also Read – Ponniyin Selvan Collection: ऐश्वर्या रॉय बच्चनच्या चित्रपटाची पहिल्याच दिवशी तगडी कमाई, जमवला एवढा गल्ला!
संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरगी काय म्हणाले कोर्टात…?
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबाजूने अशोक मुंदरगी यांनी कोर्टात युक्तीवाद केला. ते म्हणाले, एकमेकांशी पैशाची देवाण घेवाण करणे, हा गुन्हा होत नाही. तसेच याबद्दल कोणताही पुरावा आजपर्यंत तपास यंत्रणा सादर करू शकलेली नाही. संजय राऊत यांच्यामुळे पत्राचाळ प्रोजेक्टमध्ये गुरू आशिष कंपनीला मोठा फायदा झाला आहे, याबद्दलचा कोणताही तपास यंत्रणेकडे नाही.
संजय राऊत यांनी त्यांचे बंधू प्रवीण राऊत यांच्याकडून 50 लाखांचे कर्ज घेतलेलं आहे. याला अनंत पाटील हे साक्षीदार आहेत. तसेच संजय राऊत, प्रवीण राऊत, पाटकर कुटुंबीय हे अनेकदा बाहेर पर्यटनासाठीही गेलेले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संजय राऊत यांचा काहीही संबंध नाही. मात्र, ओढून ताणून त्यांचे नाव घेतलं गेलेलं आहे, असे वकील अशोक मुंदरगी यांनी कोर्टाला सांगितलं.