Maharashtra Rain Update : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. पण काही भागांमध्ये मात्र पावसाचा (Maharashtra Rainfall) जोर कायम आहे. मुंबईसह कोकणामध्ये पावसाचा (Mumbai-Kokan Rain) जोर जरी कमी झाला असला तरी सुद्धा हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतच आहे. अशामध्ये आता पुन्हा हवामान खात्याकडून (IMD Alert) राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.Also Read – Mumbai News : मुंबईमध्ये गरबा खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे. Also Read – Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ अडचणीत, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
दरम्यान, राज्यात सध्या पावसाचा (Rain) जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. मुंबईसह ठाणे परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरुच आहे. या परिसरात ढगाळ वातावरण आहे. तर गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमधील नदी, नाल्यांना पूर आला होता. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहेत. अशामध्ये फळबाग शेतकरी देखील चिंतेत आले आहेत. Also Read – Aamna Sharif Photos: आमना शरीफचा असा लूक तुम्ही कधी पाहिला नसेल, शॉर्ट्स आणि ब्रालेटमध्ये दिसतेय हॉट!