21.2 C
New York
Friday, September 22, 2023

Mangalwar Che Upay: मंगळवारी मारुतीच्या मंदिरात ठेवा गुळ-हरभऱ्याचा प्रसाद, लाभेल सुख-शांती आणि समृद्धी

Mangalwar Che Upay  : ज्योतिष शास्त्रात व्यक्तीच्या सुखी आणि समृद्ध जीवनासाठी अनेक अध्यात्मिक उपाय (Mangalwar Upay) सांगितले आहेत. हे उपाय केल्याने जीवनातील दुःख आणि शारीरिक कष्ट दूर होतात असे मानले जाते. मंगळवारचे काही उपाय ज्योतिष शास्त्रात (Tuesday Remedy) सांगितले आहेत. मंगळवारचा दिवस हा रामभक्त हनुमानजी (Lord Hanuman) यांना समर्पित आहे. या दिवशी व्रत आणि काही उपाय (jyotish  Tips) केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात आणि आशिर्वाद देतात असे म्हटले जाते. कलयुगात हनुमानजी चिरंजीवी असून त्यांच्या कृपेने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. जाणून घेऊया मंगळवारी कोणते उपाय करावे याविषयी.Also Read – Mangalwar Che Upay: हनुमानाची पूजा करताना नक्कीच अर्पण करा या रंगाचे फूल, सर्व संकटं होतील दूर

मंगळवारी करा हे उपाय

  • मंगळवारी सकाळी आणि सायंकाळी मारुतीची पूजा करणे फलदायी मानली जाते. सूर्यास्तानंतर पूजेचा विशेष मुहूर्त असतो. या दिवशीय विधिपूर्वक हनुमानजींची पूजा केल्यास शुभ परिणाम मिळतात.
  • भगवान हनुमानाला लवकर प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी मंदिरात जाऊन ‘राम नाम’चा जप करावा. बजरंगबली प्रभू श्रीरामाचे परम भक्त आहेत. त्यामुळे ‘राम नाम’चा जप अवश्य करावा.
  • मंगळवारच्या दिवशी हनुमान मंदिरात गुळ आणि हरभऱ्याचा प्रसाद ठेवावा. असे केल्याने जीवनात सुख-शांती आणि समृद्धी येते.
  • जी व्यक्ती शारीरिक समस्येमुळे त्रस्त आहे त्यांनी मंगळवारी एका भांड्यात पाणी भरून हनुमानजींच्या प्रतिमेसमोर ठेवावे. असे केल्याने शुभ लाभ होतात.
  • शक्य असल्यास मंगळवारी उपवास करून गरिबांना अन्न दान करावे. हा उपाय केल्याने धन आणि अन्नाची कमी भासत नाही.
  • बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी भगवा चोला चढवावा. तसेच सुंदर कांडचे पठण करावे. यामुळे बजरंगबलीची कृपा लाभते.
  • मंगळवारी हनुमानाला  प्रसन्न करण्यासाठी राम रक्षा स्तोत्रचे पठन करावे.
  • नोकरीच्या शोधात असलेल्यांनी मंगळवारी पानाचा विडा हनुमानजीला अर्पण करावा. यामुळे नोकरी मिळवताना येत असलेले अडथळे दूर होती.
  • तुम्हाला आर्थिक चणचण जाणवत असेल तर मंगळवारी बजरंगबलीला केवड्याचे अत्तर आणि गुलाबाच्या फुलांचा हार घाला.
  • मंगळवारी हनुमानजीच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर बसून प्रभू श्रीरामाच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करावा.

(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. india.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.) Also Read – Mangalwar Che Upay: जीवनातील संकट दूर करण्यासाठी मंगळवारी करा 'हे' उपाय, बजरंगबली होईल प्रसन्न!

Also Read – Mangalwar Che Upay: मंगळवारी करा हे उपाय, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles